Tuesday, March 8, 2011

तू म्हणशील तेच खरं.................!!!

कळलं का तूला?
त्यांनी म्हणे परवानगी दिलीय...
महिला दिनाची भेटच समज...
आता तू जायला मोकळी...,
............. खुश? अरेरे
जायचं तर आहेच गं तूला..
पण इतक्या लवकर नाही हो...
म्हणजे बघ...
हळू हळू तुझी औषधे बंद होणार..
मग अन्न पुरवठा मंदावणार...,
मग त्यांच्यासाठी तूझे अस्तित्व...
फक्त रुम नंबर पुरते मर्यादीत होणार...
मग कदाचित तू जाशीलही..., सुखाने (?)
....
.....
.......
पण काय गं?
तूझ्या जगण्यासाठी...
तुझ्या श्वासासाठी....
तूझ्या असण्यासाठी, धडपडणार्‍या त्या सख्यांचं काय?
तुझ्या वेदनेला...
मृत्यु हाच अखेरचा पर्याय असेल गं..
पण त्यांच्या प्रेमाला,
तुझ्यावरल्या मायेला...
कुठला पर्यायच नाही..., त्याचे काय?
अर्थात हा झाला आमचा स्वार्थ...
शेवटी सगळे भोग तुलाच भोगायचेत्...
तूझं असं एक्झीटची परवानगी मागणं खटकतय खरं..
पण ...
...
.......
हे असं क्षण-क्षण मरणं....?
त्यापेक्षा तू म्हणशील तेच खरं.................!!!
तूझ्यासाठी काहीही करू न शकणारा ....
विशाल... अरेरे

2 comments:

  1. किती संवेदनशील कविता लिहिलेस मित्रा !!
    Hat 's off ,तुलाही आणि खरंच तिलाही

    ReplyDelete