Friday, March 11, 2011

सद् सत विवेक बुद्धीस....

पुन्हा पाहताना थबकलीस तू
मला वाटले की विसरलीस तू...

मला या जगाची न पर्वा अता
सवे नित्य माझ्याच जगलीस तू...

फिके वाटती साज श्रुंगार हे
हळूवार गालात हसलीस तू....

नसे दु:ख जगण्यात आत्म्यासही
सदा साथ आहेस, वदलीस तू...

नसे पाहणे आज वळुनी पुन्हा
पुढे चालता आज वळलीस तू....

नको मोह ’माया’ जगाची अता
विचारातुनी आज ठसलीस तू...

कशाला बहाणे अता लाघवी..?
मला माहिती आज फसलीस तू...

सखे दु:खही हार जाई तुला
सुखाला कशी आज बधलीस तू....?


वृत्त : सौदामिनी
लगावली : लगागा लगागा लगागा लगा

विशाल...

2 comments:

  1. अप्रतिम .....छान जमली आहे ... ग्रेट..!!

    ReplyDelete