Tuesday, March 15, 2011

आम्ही लढतोय..................!

च्या मारी...
खुळखुळा झालाय मेंदूचा नुसता...

मांसाचा एवढासा गोळा...
काय काय बसवायचं त्यात?
काय-काय जाणुन घ्यायचं?
कशा-कशाचे अर्थ लावायचे......?

नैतिक-अनैतिकतेच्या बाष्कळ गप्पा...
तथाकथित इतिहासाचे...
सांप्रत अर्थहिन ठरणारे संदर्भ...
सदसतविवेकबुद्धीचे नसते घोळ...
त्यापेक्षा परवाची त्सुनामी बरी....
तिने फक्त (?) माणसे मारली !

साला, आमच्या नशिबी...
रोजच इथे कसकसले विस्फ़ोट...
आणि....
मुळापासून हलवून टाकणारे भावनिक भुकंप..
प्रत्येक क्षण घेवून येतो एक नवा धक्का...
जे नशिबवान असतात ते संपतात त्यातच....!

बाकीच्यांच्या नशिबात मात्र ...
आयुष्यभर दयामरणाच्या लढाया लढणं...
बरं, पराभवाची १००% खात्री...
लढण्याच्या आधीच अर्धी उमेद खच्ची...
ते म्हणतात...
तूम्ही कायद्याच्या निकषात बसत नाही...
आम्ही म्हणतो...
चालु द्या तुमचं.., कायदा-कायदा खेळणं अरेरे
......
.......
..........
आम्ही लढतोय..................!

विशाल

No comments:

Post a Comment