Thursday, March 17, 2011

बेफिकीरी....

*******************************************

जुनी म्लान तत्वे हवीशी कुणाला?
उगा भ्याड आदर्श पाळा कशाला?

असे सोडली लाज त्यांनी गड्यांनो
कशी खंत वाटेल लोभी मनाला?

म्हणे लोकशाही जनांचीच भाषा
हवी मात्र खुर्ची पुढारी 'बुडा'ला... (बुड : पार्श्वभाग)

इमानी मतीला नको तो 'हवाला'
हवी झोप थोडी सुखाची जिवाला

पुन्हा सांगतो आज आम्ही जगाला
नको 'अर्थ' ऐसा विषारी अम्हाला!

नको ती अमीरी नको वा गरीबी
अता बेफिकीरीच मागू 'हरा'ला !
**************************************************

विशाल

No comments:

Post a Comment