Monday, March 14, 2011

सदगुरूराय माऊली...

*******************************************************************************

सोलापूरी गेले की हमखास अक्कलकोटी माऊलीच्या दर्शनाला जाणे होते. यावेळीही अक्कलकोटी, श्री स्वामी समर्थ माऊलींच्या दर्शनाचा योग आला. कधीही जा माऊलींचे दर्शन होतेच. इथे कधी फ़ार मोठ्या रांगा लावाव्या लागल्याचे आठवत नाही. तिच्या चरणी डोके ठेवले की मन कसे शांत होवुन जाते.

चरण सदगुरुंचे, पंचप्राण माझे                               
सर्वतीर्थे दावी , सदगुरुराय माझा !!

गुरु सुखांचे आगर, गुरु भाग्य दाता
ज्ञानियांचा राजा, गुरुराज माझा !!

सेविता दु:खिता, ठेवा ऐहिकाचा
सदैव पाठीशी तो, स्वामीनाथ माझा !!

चैतन्याचा स्त्रोत, ते अद्वैत स्वरुप
मुर्तीमंत कैवल्य, प्रभुराय माझा !!

आता पश्चाताप, सारी उतरली भूल
आशिर्वादे ठेवील, वटवृक्ष माझा !!

तोचि सगुण, तोची निर्गुण, स्वयं परब्रम्ह
स्वामी समर्थ माझे,अक्कलकोटी राणा !!

श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय !

*******************************************************************************
विशाल

No comments:

Post a Comment