Thursday, May 5, 2011

दगडास देव मीही म्हणणार आज आहे.....

   
    जगलोच ना कधीही, जगणार आज आहे,
    मरणावरी पुन्हा मी हसणार आज आहे.

    म्हणतात दांभिकांचा नसतोच देव कोठे,
    दगडास देव मीही म्हणणार आज आहे.

    नव्हती कधीच तेव्हा चिंता मला उद्याची?
    स्वप्नात मात्र थोडा रमणार आज आहे...

    गझलेस भेटलोकी, मी बोलतो सुखाने,
    दोस्ती मुकेपणाशी करणार आज आहे.

    शब्दांस रोज माझ्या, नियमात बांधतो मी,
    ही वाट वेगळी मी धरणार आज आहे...!

    विशाल....
   

2 comments: