Saturday, May 14, 2011

तसाही मी कुण्या वादात नाही....

स्मरावे हे तुझ्या रक्तात नाही
विसरणेही तुझ्या लक्षात नाही

सखे धुंदी खरी ओठात आहे
नशा ती या मदिर प्याल्यात नाही

कशाला बाळगू भीती जगाची?
तसाही मी कुण्या वादात नाही

निघालो मी पुढे सोडून वस्ती
कुठे तो मार्ग जो मज ज्ञात नाही?

विशाला, सोड ना बाता फुकाच्या
जरब मित्रा तुझ्या शब्दात नाही

विशाल...

No comments:

Post a Comment