Tuesday, May 24, 2011

लागलो जेव्हा हसाया ....


*****************************
वाटले तो ध्यास होता
जाणिवांचा र्‍हास होता

विसरलो जो काल मागे
'आज'चा तो भास होता

जाळणारा स्वप्न माझे
लाघवी मधुमास होता

स्पर्श ओला श्रावणाचा
कीं सुखांचा फास होता?

दु:ख होते सोबतीला
साजिरा सहवास होता

कोण येथे गौण आहे?
भेटला जो, खास होता

लागलो जेव्हा हसाया
संपलेला श्वास होता

*****************************

विशाल...

No comments:

Post a Comment