Saturday, May 14, 2011

"मोरपिस" हरवलंय....

दहावी, बारावी,
इंजीनिअरींग.........
मग असंख्य इंटरव्ह्युज...
शेकडो नकार पचवल्यानंतर,
पदरात पडलेली अनपेक्षीत नोकरी!
मग सुरू झालं नवं चक्र...
रिपोर्टस् , टार्गेट्स, कोटेशन्स
अधुन मधून फसवी इन्क्रिमेंटस्....
.......
.........
...........
नाहीच आठवत आता मला...
घोंगावणार्‍या वार्‍याबरोबर पुढे जाताना,
मागे बसलेल्या तुझ्या, ओढाळ केसांचा तो मादक गंध...

शेवटचं कधी गेलो होतो गं आपण फिरायला?
गेल्या कित्येक दिवसात मी अनुभवलीच नाहीये..
मज्जा तुझ्या रुसव्यातली...
तुझा रुसवा घालवताना तुझ्या हट्टासमोर मान तुकवण्यातली...

माझं...
माझं "मोरपिस" हरवलंय बहुदा कुठेतरी !

विशाल

3 comments:

  1. कवी लोकांना किमान कवितेची तरी साथ आहेच...
    माझी कविता हेच माझे मोरपीस...ते कायम जवळच असते...

    ReplyDelete
  2. धन्यवाद सागर आणि बंड्या !
    खुप खुप आभार.... :)

    ReplyDelete