Tuesday, May 24, 2011

पहिला पाऊस...

************************************************************


राहवणार नव्हतंच त्याला !
कुणी इतका वेळ दूर राहू शकतो का?
जिवाभावाच्या दोस्तांपासून !
तो तर अगदीच माणुसवेडा..
माणसाच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला शोधणं,
खुप... म्हणजे खुपच आवडतं त्याला,
माणूस दु:खात असला की तो अश्रु बनून कोसळतो,
सुखात असला तरीही आनंदाश्रु बनुन येतोच...!

मग येताना येतो घेवुन सोबत..
सुगंध प्रियेच्या पहिल्या स्पर्शाचा !
मोकळा होतो अलगद मग गुदमर...
तिच्या विरहात घालवलेल्या एकाकी रात्रींचा !

तसा तो आजही आला...
मी येणार आहे लवकरच,
हळुवारपणे गालावर टिचकी मारत,
ग्वाही देवून गेला... !

चला...
माळ्यावरची सतार खाली काढायला हरकत नाही!

************************************************************
तळटिप : काल सकाळी अचानक दोन मिनीट भुर भुर पावसाने हजेरी लावली आणि........विशाल

No comments:

Post a Comment