Friday, June 3, 2011

शैशव...

कसा आहेस?
आज काल भेटत नाहीस पुर्वीसारखा...
त्याने खांद्यावर हात टाकत विचारलं
तसा सुस्कारलो हलकेच...
एक स्तब्ध नि:श्वास टाकत म्हणालो,
वय झालं रे आता...
नाही जमत पहिल्यासारखं वारंवार यायला,

वेडा की काय?
अरे असं वय वगैरे कधी असतं का ?
त्या व्याधी देहाच्या...
मनाच्या हिरवेपणाला कसलं आलय वय?

कायरे...
आपल्या भेटीला स्थळकाळाची बंधनं कधीपासून पडायला लागली?
आणि तूला कुठेही यायची किंवा जायची गरजच काय?
अलगद, अगदी हळुवारपणे, पण मनापासून
आपल्याच मनाच्या कुठल्याही कोपर्‍यात डोकवायचं...

आणि घालायची मला एक साद...
बघ तुझं ते 'चिरतरुण' शैशव धावतच येतं की नाही!

विशाल...

1 comment:

  1. मनाच्या हिरवेपणाला कसलं आलय वय?

    chhan

    ReplyDelete