Friday, June 3, 2011

मत्सर...

गंमतच आहे सगळी...
त्याला माझाही...
अगदी माझाही मत्सर वाटावा?
ओके, अ‍ॅग्रीड...! मी आलो की ती सुखावते..
मी पाहीलेत, माझ्या आगमनाने...
तिच्या अंगोपांगी फुललेले निशिगंध,
मी अनुभवली आहेत, माझ्या ....
ओझरत्या स्पर्शानेही शहारून आलेली तिची गात्रे!

कधी कधी नकळत तिच्या हनुवटीवर रेंगाळते माझी नजर...
आणि मग ती हरवते...
तो संतप्त होतो, रुसतो, चरफडतो...
तिला म्हणतो,
तू अशीच आहेस...
तो आला की मला विसरतेस...., मला पण?

तुला खरं सांगू...
ती तर मला आवडतेच रे...
पण तुझा तो रुसवा पण मोहवून टाकतो,
प्रेमाचं असंच असतं बघ...
त्याला कुणाशीच वाटणी मान्य नसते...
मग वाटणीदार माझ्यासारखा सखा का असेना !

अरे वेड्या, तुला कळत कसे नाही?
तिच्या हरवण्यात तर मज्जा आहे खरी,
त्यावेळी ती कसली गोड दिसते माहितीये?
तिला तशी मुग्ध बघीतली ना...
की मग मलादेखील उत्साह येतो...

आणि मग...
मी आनंदाने, भरभरून बरसायला लागतो...!!

विशाल...

2 comments: