Tuesday, June 7, 2011

पुण्यात...


समस्त पुणेकर मित्रमंडळींची व्हर्चुअल क्षमा मागून......  !

पुण्याची वाट
ट्राफिकची पण 'वाट'
डोक्याचा बोरघाट
पुण्यात ...


मुळा-मुठेची दलदल..
सुगंधी (?) दरवळ
नाकातोंडाची कळकळ
पुण्यात...

बुद्धीवाद्यांचा थयथयाट
लेखकूंचा जळफळाट
म्हमईकर 'चाट'
पुण्यात...

मराठी अफाट
हिंग्लीशची साथ
पुणेकर सुसाट
(फक्त) पुण्यात ...

आय.टी.ची भरारी (आय.टी. : इंटलेक्चुअल तळतळाट)
माणूस भिकारी
कंपूबाजी भारी
पुण्यात ...

विचलित चित्त
संपवते 'वित्त'
स्टेपनीचा संग
पुण्यात (कँपात) .....

पुणेकर होवू घातलेला ' इरसाल म्हमईकर '....

1 comment:

  1. मस्त. मजा आली कविता वाचताना ( अर्थात पुणे करांची क्षमा मागून )

    अमोल केळकर

    ReplyDelete