Tuesday, June 7, 2011

मुंबैत...

राणीचा हार
राजाचे दार
राज्याचा दरबार
मुंबैत...

पारश्यांची अग्यारी
हिंदुंची शितलाई
नांदते जुम्माबाई
मुंबैत...

U.S.A. ची भेसळ
मामलेदारी मिसळ
अमराठी कुसळ
मुंबैत...

सी लिंक शाईन
बेस्ट इज फाईन
लोकलची लाईफ लाईन
मुंम्बैत...

मराठी मैय्या
अगोचर भैय्या
भाषा बंबैय्या
मुंबैत...

लालबागचा राजा
मस्जीदचा खाजा
महालक्ष्मीची येजा
मुंबैत...

वानखेडेचा पेस
घोड्यांची रेस
बायकींगची ऐश
मुंबैत....

सोडा गजाल्या
काळजी कशाला
इरसाल इशाल्या
मुंबैत...

इरसाल म्हमईकर

राणीचा हार : क्वीन्स नेकलेस (मरीन ड्राईव्ह)
राजाचे दार : गेट वे ऑफ इंडीया

3 comments: