Friday, July 8, 2011

तो तसा वेडाच आहे....

पावसाने, पावसाची ऐकली गाणी कधी
गर्द काळ्या अंबराशी मारल्या गप्पा कधी

डोलला वार्‍यावरी तो, बोलला माझ्यासवे
नाचल्या धारा जळाच्या होवूनी गारा कधी

शामरंगी रंगली, अवघी धरा गंधाळली
ना नभांनी तोडले, नाते धरित्रीशी कधी

अजुन ओल्या अंगणाचा गंध वेडावे मला
रातराणीचा तसाही लोभ जडला ना कधी

तो तसा वेडाच आहे, बरसतो धुंदावुनी
पावसाने टाळली ना ओढ वसुधेची कधी

विशाल.

No comments:

Post a Comment