Friday, July 8, 2011

तो तसा वेडाच आहे....

पावसाने, पावसाची ऐकली गाणी कधी?
गर्द काळ्या अंबराची ऐकली वाणी कधी?

डोलला वार्‍यावरी तो, बोलला माझ्यासवे
नाचल्या गारा जळाच्या होवूनी पाणी कधी?

शामरंगी रंगली, अवघी धरा गंधाळली
ना नभांनी तोडले, बोलली राणी कधी?

अजुन ओल्या अंगणाचा गंध वेडावे मला
रातराणी ने पुन्हा केलीत गार्‍हाणी कधी?

तो तसा वेडाच आहे, बरसतो धुंदावुनी
पावसाने टाळली ना ओढ वारुणी कधी?

विशाल...
(सुधारणा आणि मार्गदर्शन : मायबोलीकर श्री. शायर हटेला )

2 comments: