Thursday, July 14, 2011

बच्चो..., बजाव ताली !

ते येतात, गोळ्या झाडतात
आम्हीही मग उचलतो..
आमच्या मोडक्या-तोडक्या बंदुकी
वरचे म्हणतात...
सहिष्णुता पाळा...
बच्चो ..., बजाव ताली !

रक्ता-मांसाचा चिखल,
आसमंतात भरलेले नसते आक्रोश
पायात कडमडणारे तुटक्या बांगड्यांचे तुकडे
आम्ही सांगतो स्वतःला...
'स्पिरीट' पाळा...स्पिरीट !
बच्चो..., बजाव ताली !

मुंबईत तीन स्फ़ोट...
दुसर्‍या दिवशी मुंबईकर कामाला...
आता अजुन एक मेणबत्ती मोर्चा
चौका-चौकातुन लागलेले कट आउट्स
रोजगाराचे नवे साधन.... हुर्रे... Sad
बच्चो...बजाव ताली !

'हिरो'चा वाढदिवस...
IED चे फटाके...
जखमी लोकांचे बेधुंद (?) चित्कार
आजचा बेत चिकन बिर्याणी,
'कसाब' च्या नावानं..........
बच्चो..., बजाव ताली !

बडे बडे शहरोमें छोटी-छोटी बाते(?)
९९% हल्ले थोपवण्यात आलेलं यश(?)
३१ महिन्यात एक (च) हल्ला...
हल्ले तर अमेरिकेवरही होतात!
मग मुंबईचंच एवढं कौतुक कशाला?
बच्चो..., बजाव ताली !

काल स्फोट झाले..
आज वातावरण तप्त आहे
उद्याही स्फोट होतील...
वातावरण अजुन तापेल!
त्यात काय? अजुन एक कविता पाडू...
दोन मिनीटे मौन पाळून श्रद्धांजली वाहू...
जमल्यास शेजार्‍याला निषेधपत्रक पाठवू...
तोपर्यंत...
बच्चो..., रुको मत ! बजाव ताली !!
आपल्याला तेवढंच जमतं नाहीतरी.............

(अनेक षंढापैकी एक षंढ भारतीय......!)

4 comments:

 1. काय बोलू विशालदा... :( :( :(

  ReplyDelete
 2. बच्चो..., रुको मत ! बजाव ताली...
  तेच करतोय विशालदा .. टाळ्याच बडवतोय

  ReplyDelete
 3. कधी कधी असह्य होतं रे.............

  ReplyDelete