Friday, August 5, 2011

तरही गझल : रीत नाही


****************************

माज मी लपवीत नाही
ही जगाची रीत नाही

तंटतो मी, वागण्याचे
कायदे पाळीत नाही

तोडले मी बंध सारे
संपण्याला भीत नाही

बोलतो मी, ऐकण्याचे
वायदे मानीत नाही

टाळतो मी मित्र आता
शत्रुता माहीत नाही

दांभिकांशी वैर नाही
मीच संभावीत नाही

झुंजतो दैवासवेही
संकटे गणतीत नाही

का विशाला थांबला रे?
ते तुझ्या नियतीत नाही !

****************************

विशाल...

4 comments:

  1. मस्तच विशालदा .....लगे रहो .....

    ReplyDelete
  2. मुजरा सरकार.... निव्वळ अप्रतिम !!!

    ReplyDelete