Friday, August 5, 2011
तरही गझल : रीत नाही
****************************
माज मी लपवीत नाही
ही जगाची रीत नाही
तंटतो मी, वागण्याचे
कायदे पाळीत नाही
तोडले मी बंध सारे
संपण्याला भीत नाही
बोलतो मी, ऐकण्याचे
वायदे मानीत नाही
टाळतो मी मित्र आता
शत्रुता माहीत नाही
दांभिकांशी वैर नाही
मीच संभावीत नाही
झुंजतो दैवासवेही
संकटे गणतीत नाही
का विशाला थांबला रे?
ते तुझ्या नियतीत नाही !
****************************
विशाल...
Subscribe to:
Post Comments (Atom)
अप्रतिम गझल
ReplyDeleteमस्तच विशालदा .....लगे रहो .....
ReplyDeleteमुजरा सरकार.... निव्वळ अप्रतिम !!!
ReplyDeleteमन:पूर्वक आभार राजेहो :)
ReplyDelete