Tuesday, August 30, 2011

हाय ओला बरसतो पाऊस आहे...

धुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...

माय काळी आज पान्हावे नव्याने
स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे...

रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे

वीज कोसळते, सरी होती कट्यारी
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

बघ धरा ओलावली आता कशाने?
भेटताना हरखतो पाऊस आहे...

का चकोरा येतसे ग्लानी सुखाने?
की तयाला भरवतो पाऊस आहे...?

चल 'विशाला' जावुया रंगून आता
अंगणी या बहरतो पाऊस आहे...

विशाल

No comments:

Post a Comment