Sunday, September 11, 2011

सोबतीला गझल येता थांबणे आता नको

******************************************

डाव तेव्हा मोडलेला मांडणे आता नको
काळजाला छेद जाता सांधणे आता नको

पावसाला यायचे आहेच माझ्या अंगणी,
तेवढ्यासाठी उन्हाशी भांडणे आता नको

सांग मोरा, पावसासाठीच का नाचायचे?
बोल ना तूही चकोरा, “चांदणे आता नको!”

कल्पना या नवनव्या झरतात शब्दांच्या सवे
सोबतीला गझल येता थांबणे आता नको

तो खुळा आहे विशाला, टाळणे त्याला बरे,
निंदकाची कौतुके वा भांडणे आता नको


******************************************

विशाल.

4 comments: