Thursday, September 15, 2011

संपले शत्रुत्व आता, राहिली पण तेढ ती..

*******************************************************

मांडलेला, डाव अवघड, मोडणे सोपे कुठे?
जोडली, नाती नकोशी, तोडणे सोपे कुठे?

माणसाला वास्तवाचा रंग होता आगळा
फासला हरताळ, त्याला खोडणे सोपे कुठे?

संपले शत्रुत्व आता, राहिली पण तेढ ती..  
सख्यही मित्रा, तुझ्याशी जोडणे सोपे कुठे?

आज माझ्या भावनांचा गावही झाला रिता
जाणिवांचा हात आता सोडणे सोपे कुठे?

एकटा नाहीस तू, जत्रा तुझ्या मागेपुढे,
सांग, वाचा वेदनेला फोडणे सोपे कुठे?

या जगाने तोडलेले बंध सगळे आपले
राहिले नाते स्वतःशी, जोडणे सोपे कुठे?

*******************************************************

विशाल...

No comments:

Post a Comment