Tuesday, November 15, 2011

माजी चुकीच झाली गं...आये!

आयला..
ह्येला बालदिन म्हंत्येत व्हय?
तुला मज्जा सांगतु आये...
कालच्याला साळंत गेलतू...!
आस्सं डोळं फाडाया काय झालं गं आये..
ततं मैदानाच्या भायेरच हुबा हुतो...
लै मज्जा हुती बग...
समदी प्वारं साळंच्या आंगणात जमल्याली
मग त्या कुणातरी दाडीवाल्याचा फटू लावला हुता मोट्टा...
त्ये गांधीबाबाबी हुतं एका फटूत...
लै भारी गोष्टी सांगटल्या समद्यांनी
प्वारं तं गाणी बी बोलत व्हती...
मंग समद्यास्नी खायाला दिलं..
मले बी एक समुसा आन जिलबी मिळ्ळी
मग प्वारं-पोरी लै म्हंता लै खेळ्ळी बग..
म्या ततंच हुबा हुतो...
चार वाजेपत्तूर....
लै मज्जा आली बग..लै म्हंता लैच !
...
...
..
..
ए आये, अशी रागाला नगो ना येवू..
म्हायतीये मला...
माजी चुकीच झाली गं...आये!
आजची 'रोजी' बुडलीच गं...
वर मुकादम उद्याच्याला श्या घालील त्ये हायेच!

विशाल...

1 comment:

  1. विशाल,
    मस्त.हि कविता वाचायची राहून गेली असती तर आमची चुकी झाली असती.छान...बांधकामाच्या साईट वरील कामगारांच्या मुलांची पण अगदी अशीच अवस्था होते... त्यांच्या व्यथा नि वेदना सुद्धा ह्या पेक्षा वेगळ्या नसतील... नाही का?

    ReplyDelete