Monday, February 20, 2012

अंधारभूल

**************************

कधी अचानक भुतकाळातून
गर्दसावळ्या तुझ्या चाहूली
हृदयातील गुंत्या-गुंत्यातून
खुणावणार्‍या त्या रानभूली

आठवणींचे उदास काहूर
मना-मनाला व्यापत जाते
बहरात कोवळ्या तरुणाईच्या
कधी अचानक मळभ दाटते

हलकेच कधी अंतरातूनी
ऐकु येते आर्त विराणी
जुन्या वहीच्या पानांमधली
सुरकुतलेली जिर्ण निशाणी

कधी अचानक पैलतीरावर
तुझ्या वेणूचे सुरेल स्वर
मखमल ती गात्रा-गात्रांवर
अंधारभूल मग होते धुसर

**************************

विशाल

No comments:

Post a Comment