Wednesday, March 14, 2012

मग कळेल मझा...

तू काही ऐकणार नाहीस
मीही आपला हट्ट सोडणार नाही...

तू घरात बसून....
बायकोच्या हातची भजी खात,
समाजातल्या विकृतींवर बोलणार...
वातानुकुलीत सभांमध्ये भाषणे ठोकणार
जमलंच तर झणझणीत कविता पाडणार

मला नाहीच रे जमणार...
तुझं हे तळ्यात - मळ्यात खेळायला
आत एक अन बाहेर एक जमवायला
आपलं कसं सारं एकदम सडेतोड असणार
आम्ही प्रत्येक प्रसंगाला थेट शिंगावर घेणार

नाही रे जमत मला असं जगणं
हे असं कौलातून झिरपणार्‍या,
थेंबभर कवडशांच्या मागे धावण्यापेक्षा
केव्हातरी उंबरठ्याबाहेर पाऊल टाक
चटके देणारं लखलखीत उन्ह अंगावर घेवुन बघ

मग कळेल मझा...
बेभान होवून जगण्यातला
'मी'ला विसरून स्वतःलाच उधळून देण्यातला !

विशाल

No comments:

Post a Comment