Wednesday, March 28, 2012

जाणिव मग पुनरागमनाची


मायबोलीकर/मीमकर श्री उदयवन यांनी मांडलेल्या चित्रावरून कविता या उपक्रमात पहिल्या चित्रावरुन सुचलेल्या ओळी

पाहतो नभाशी जोडण्या
मी नवे अनामिक नाते
परि दशा जाहली जैसे
मातीशीही तुटले नाते

खंत नुरली मनात कसली
हे भोग असती प्राक्तनाचे
नकळत सरली नाती सगळी
आता आकर्षण मोक्षाचे

हे बंध तोडले अलगद सारे
परि तिथेच थांबला काळ
खुणावतो बघ पैलतीर तो
सख्या रे झाली संध्याकाळ

मी मलाच सांगतो सारी
कहाणी त्या गतवैभवाची
पायाशी अंकुर नवा मम
जाणिव मग पुनरागमनाची

विशाल


No comments:

Post a Comment