Wednesday, May 2, 2012

तुझे मी स्मरावे तराणे किती....

खुळ्या अंतराचे बहाणे किती
कुणी सांग व्हावे दिवाणे किती

जरा जाग येता पुन्हा आठवे,
असे स्वप्नही ते शहाणे किती

पहा लाज सारीच मी सोडली
उगा चोरुनी ते पहाणे किती?

कळेना कसे आवरु या मना
अता ओळखावे निशाणे किती

तुझे नाव माझ्या मनी कोरले
फुका आळवू ते उखाणे किती

सुखे भोगली सर्व दु:खांसवे
नव्या यातनांची नहाणे किती

सखे आज गर्दीतही एकटा
तुझे मी स्मरावे तराणे किती

तुझे सूर आलेत ओठावरी
सखे आज रंगेल गाणे किती

विशाल

No comments:

Post a Comment