Wednesday, October 31, 2012

मौन बोलु लागले...

मराठी कविता समुहाच्या "लिहा ओळीवर कविता - भाग १०१" साठी लिहीलेली कविता..
या वेळची ओळ होती "आज माझ्या वेदनेला...."

आज माझ्या वेदनेला
थोडके हंसु आले
शब्द सारे संपले अन्
मौन बोलु लागले

नाचला अलवार श्रावण
रावे गाऊ लागले
मत्सर वाटे अन् सुखाला
दु:ख नाचु लागले

जाणिवेला वेदनेच्या
जखमांनी सांभाळले
व्रण ते गेल्या दिसांचे
भरुन येवु लागले

भावनेला अन मनीच्या
पंख नवे लाभले
मनपक्षी, आकाशी वेडे
झेप घेऊ लागले

विशाल

No comments:

Post a Comment