Friday, March 15, 2013

डोळ्यामधील फितुरा मज टाळता न आले

काल स्व. भटसाहेबांची पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने त्यांच्याच एका गझलेतील ओळीवर केलेली ही 'तरही' गझल. स्व. भटसाहेबांना विनम्र अभिवादन !
समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !
..................... स्व. सुरेश भट
*************************************

"समजावुनी व्यथेला समजावता न आले"
हा दोश फ़क्त माझा झिडकारता न आले

पक्के मिटून अधरा मी दार बंद केले
डोळ्यामधील फितुरा मज टाळता न आले

मरणासवे तसा मी ना चाललो सुखाने
जिवनासही कधी मज नाकारता न आले

होती तशीच आहे कविता अपुर्णतेची
शब्दांत भाव माझे का मांडता न आले?

जा.., टाळ हासणेही, हलकेच तू विशाला
तुज बंध आसवांचे सांभाळता न आले !

*************************************
वृत्त : आनंदकंद
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

विशाल...

No comments:

Post a Comment