Sunday, March 31, 2013

आवाज.....



शटअप यार..
तू पुन्हा वैतागलास, ओरडलास सुद्धा
ठिक आहे यार...
माझं काय जातय?
शटअप तर शटअप...
माहीतीये मला...
आजुबाजूच्या गोंगाटाला कंटाळला आहेस तू
नाही सहन होत तूला आजकाल
आवाज...
आवाज...,त्रास देतात
आवाज मनस्ताप देतात
आवाज हसवतात, आवाज रडवतात
तुझ्याशी बोलताना तुलाच फसवतात..
आवाज आवाजांचे
आवाज माणसांचे..
आवाज वाहनांचे
आवाज वर्दळीचे
आवाज उंचच उंच वाढलेल्या झाडातून
सु सु करत वाहणार्‍या वार्‍याचे..
आवाज मोठे मिश्किल असतात बरं..
कधी अलगद श्वासांशी बोलतात
कधी हळूवार श्वासांतून बोलतात
शास्त्रज्ञ पण वेडेच असतात...
अमुक-तमुक इतक्या हर्टझपेक्षा कमी क्षमतेचे असले..
की आवाज निरुपद्रवी असतात म्हणे
त्यांना कुठे माहीतीये?
आवाज शांततेचेही असतात..
आवाज मौनालाही असतात
हवे असतात...
तेव्हा वीजेच्या गडगडाटालाही तबल्याचे सुर देतात
त्यांची गरज नसली की मात्र...
बासूरीसुधा कर्कश्श वाटायला लागते
आवाजच ते...
कसे वागायचे ते स्वतःच ठरवतात
कधी तुझ्या मनाविरुद्ध जातात
आणि मग...
मग मौन...
तहाची बोलणी.. की..
कदाचित एका नव्या वादळाची सुरूवात !

विशाल

No comments:

Post a Comment