Thursday, May 9, 2013

इशारे....उगाच खोटे तिने रुसावे, लबाड माझे नकार असती
तसे तुझेही किती मुखवटे, खुळावणारे चिकार असती

पुन्हा पुन्हा का हसून मीही फसावयाला तयार होतो
कितीक शपथा, किती कहाण्या, तुझे बहाणे हजार असती

खुणावणारा उनाड वारा.., शहारलेली कुंवार काया
तुला पहाता हळहळणारे, नयन सखे बेसुमार असती

क्षणात हासू, क्षणात आंसू..., असे तुझे वागणे दुटप्पी
हसून खोटे भुलावण्याचे, कितीक फसवे प्रकार असती

मनात माझ्या हजार शंका, तुझेच नखरे तुझ्या विनवण्या
फुलून येते नवीन प्रीती, तसे इशारे चुकार असती

विशाल...

No comments:

Post a Comment