Friday, October 4, 2013

हि दिल्ली हाय एक जतरा ...

आमची प्रेरणा अर्थातच जगदिश खेबुडकरांचं हे जिवंत गाणं

ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा
जो दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा

पाच वर्षाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी
नाव कुणाचे, नाकामंदी कुनी बांदली दोरी
जागा होऊन बोलल त्याला, हाय कमांडचा हादरा

यु आयडीचा शिनीमा बगा, बगा सोडुनी काम
आधार झाला निराधार ना इथे राहीला राम
कितीक योजना आशा लावूनी उगा दावतीया नखरा

ह्यो फिरता घोडा नाव त्याचं सरकार
कुनी नोकरशहा, मंत्री-संत्री टांग टाकुनी स्वार
हितंच हाय परि दिसत न्हाई पब्लिक मारतय चकरा

हि लोकशाहीची खानावळ लै खवाट
कुनी चोर भेटतो, भ्रष्ट कुनी, कुनी 'भाट'
सवलतीसाठी लाळ गाळुन शेपुट हालवी कुतरा

ह्या सत्तेपायी इसर पडतो जनतेचा
कागदावरी पाऊस पडतो सुसाट खोट्या वचनांचा
आश्वासनांची जंत्री घेऊन पब्लिकला मारत्यात पतरा

ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा
ह्या दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा ... !!














तळटिप : ('दिल्ली' हा शब्द इथे सत्तेचे प्रतिक म्हणून वापरलेला आहे. 'दिल्ली' या शहराविषयी मनात कसलाही आकस नाही)


इरसाल म्हमईकर  

No comments:

Post a Comment