Friday, March 7, 2014

नव्या मीमराठीचा नवा संकल्प

मंडळी, बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपले 'मीमराठी' पुन्हा दिमाखात तुमच्या सेवेत रुजू झालेले आहे. त्याला पुन्हा पहिल्यासारखी समृद्धी मिळवून द्यायला सिद्ध होवुया.

या निमित्ताने माझ्या एका 'जुन्या विडंबनाचे' "नवे विडंबन" नव्याने टाकतोय.... :)

पुन्हा नव्याने जुन्याच जागी तसेच सारे जमूत मित्रा
जुन्या दिसांच्या चविष्ट गप्पा पुन्हा जरा आठवूत मित्रा...

मनात खळखळ, उरात धडधड, फिरून येइल म्हतारबाबा
नसेल झेपत खट्याळ बुड्ढा, तरी जरासे नडूत मित्रा....

मनात व्हिस्की, करात मसुदा.., नवा प्रकाशक दिसेल आता
नवथर कोर्‍या, प्रकाशकाला अता जरा चल छळूत मित्रा...

उगाच तूम्ही तया चिडवता, तशात गांजा महाग झाला
भरून चिलमी अबोल स्वामी, स्मरून खळखळ हसूत मित्रा...

तुडुंब भरता नयन मधूने पुन्हा स्मरे मग सखी नशीली
ब्रुसेल्सची ती मदीर ऑड्री, स्मरून तिजला जगूत मित्रा...

कराडच्या त्या निवांत पक्ष्या लिहावयालाच लावु यंदा
नकोत लिंका लिही जरासे, तयार तज्ञा करूत मित्रा

'अमेय' कविता, 'अतुल्य' लेखन, गुरूजनांची 'सुमन' तपस्या
मिमावरी त्या प्रगाढ चर्चा 'पुन्हा घडाव्या' म्हणूत मित्रा

उतावळा तू मनात इतका कशास "विशल्या" पुन्हा शहाण्या ?
क्रमश: लिहावे, लिहित रहावे..., असूत किंवा नसूत मित्रा...


ईरसाल म्हमईकर

No comments:

Post a Comment