Monday, June 2, 2014

कुठे भक्त-वेल्हाळ ठावे कुणाला?घुमे येथ पावा, कळावे कुणाला?
सखे सावळा श्याम पावे कुणाला?

झुरे काजवा, आकळेना मना रे
निशेचे बहाणे फळावे कुणाला ?

तसाही जरा मेघ वेडाच आहे
धरा लाजली, आकळावे कुणाला?

सखा तूच मृत्यों जिवा लाभलेला
दुज्या मी इथे आजमावे कुणाला?

झिजे सावली साथ सोडी तनूची
तुटे मैत्र मग दोष द्यावे कुणाला?

नसे मंदिरी ना दिसे राउळी तो
कुठे भक्त-वेल्हाळ ठावे कुणाला?

नकोसे 'विशाला' जगाचे भुलावे
विठू सोडुनी आळवावे कुणाला ?

विशाल ...

No comments:

Post a Comment