Monday, June 9, 2014

स्वप्न निळे ...

पंख हिरवे, शुभ्र पिसारे...
ल्याली धरती वस्त्र साजिरे
पानोपानी, तरु वेलींवर...
स्वप्न निळे ...
अधिरा सागर, अतृप्त वसुधा
गातो पाऊस दिडदा दिडदा
स्तब्ध पंकजा, कमलदलावर...
स्वप्न निळे ...
अजाण पक्षी, सुजाण वारा
उन्मुक्तावर स्वच्छंद पहारा
मुग्ध क्षितीजा, आरक्त प्रतली
स्वप्न निळे ...
कधी अकाली, उनाड पाऊस
कधी चातका मृगजळ पाऊस
अतृप्त 'मयूरा' , मोर नाचती
स्वप्न निळे ...
चांदणराती घडे चौघडा
चन्द्र उलगडे तुकडा तुकडा
स्निग्ध चांदणे, मिलन प्रियकरा
स्वप्न निळे ...
विशाल.

No comments:

Post a Comment