Tuesday, May 24, 2016

हवीस तू ....

बर्‍याच दिवसात या आवडत्या लेखनप्रकाराला हात घातलेला नाही, म्हटले चला आज जरा कल्ला करुयात.

खुपदा असे होते की टेबलावरची मैफील बर्‍याच रात्रीपर्यंत रंगते, विशेषतः ती एखाद्याच्या घरी जमलेली असेल तर अजुनच. अशा वेळी हळू-हळू मदीरेच्या आहारी जाता-जाता जवळच्या धुम्रकांड्या कधी संपत जातात ले लक्षातच येत नाही. एक वेळ अशी येते की शेवटची एकच शिल्लक राहते. रात्र बरीच झालेली असल्याने आता नव्याने विकत मिळण्याची शक्यता राहीलेली नसते. तेव्हा साहजिकच शेवटची धुम्रकांडी मैफील संपल्यावर वापरू या भावनेने शिल्लक ठेवली जाते. या शेवटच्या धुम्रकांडीची किंमत फक्त अट्टल दारुड्यासच कळू शकते...

त्या शिल्लक उरलेल्या शेवटच्या धुम्रकांडीस मनःपूर्वक.....
आमची प्रेरणा : अर्थातच कविवर्य श्री. जगदीश खेबुडकर यांची क्षमा मागुन

हवीस तू, हवीस तू, हवीस मज तू, हवीस तू
तनु डोलते मदीरेसंगे दूर उभी का उदास तू?

रतीसौंदर्यही पडे तोकडे, धुराविना हे झिंगून जाणे
तुझ्यापुढे मज स्कॉच बापुडी, झुरतो मी अन् हताश तू

या सोनेरी धुराड्यातूनी, रात्र जागते दिवस होवूनी
वलयांकित त्या धुम्रकलांनी, गुंगवणारा सुवास तू

तारुण्याच्या उंबरठ्यावर, मादक तुजवर जडली प्रीती
या मोहाच्या पूर्तीसाठी, होशील का मम प्रयास तू

इरसाल म्हमईकर....

No comments:

Post a Comment