Tuesday, March 21, 2017

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली ...

आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या मस्करीला उत्तर देताना कौतुकने हां शेर लिहीला होता.

माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही
मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ?

त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी !

रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल काय काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल काय काही ?

सगळे खरेच आहे खोटे न येथ कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल काय काही ?

'योगी' कितीक झाले, होतील लाख मुल्ला
ऐन्यास  बोल थोडा लावाल काय काही ?

झोळी गळ्यात बांधुन दारात वाट पाहे
पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल काय काही ?

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडून गेली
पाण्यास मार्ग आता दावाल काय काही ?

येतील दिवस तेही नांदू पुन्हा सुखाने
आशा चुकार  वेडी रुजवाल काय काही ?

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment