Friday, March 29, 2019

परी



सोनसावळी
स्वप्ने सगळी
रूप सुखाचे
घेवूनी आली

भाळावरती
कुंतल कुरळे
ओठावरचे
हसु कोवळे

टकमक डोळा
किती कुतूहल
आले कुठे? ही,
कसली वर्दळ

हळवा बाबा
आतुर आई
अधिर मनाला
नवी नवलाई

दंतहिन परि
हसू निरागस
जणु सुखांनी
भिजले नवरस

या हास्यासम
अमृत नाही
या सौख्याला
तुलना नाही

© विशाल कुलकर्णी





No comments:

Post a Comment