Friday, June 7, 2019

पाऊल ..



बघता बघता भरकटले पाऊल
चुकूनी कसे अन चुकले पाऊल
मिटून घेतले मी डोळे अलगद
धुळपाटीवर बघ उठले पाऊल

निःशब्द शांतता अशांत पाऊल
तृणात हिरव्या रूतले पाऊल
संन्यस्त जलाशय गहीरे पाणी
डोळ्यात कुणाच्या भिजले पाऊल

कुठल्या वळणावर फसले पाऊल?
चुकल्याच खुणा हिरमुसले पाऊल
गहिवरले नकळत चूकार डोळे
उगाच खुतून चरफडले पाऊल

हसले पाऊल फसले पाऊल
ग्रीष्मात कोरड्या खचले पाऊल
मग वर्षेची रिमझिमता चाहूल
उत्साहाने सळसळले पाऊल !

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment