कविराज भुषण

छत्रपती शिवाजी महाराज की जय !


कविराज भूषण हा प्रख्यात हिंदी (ब्रज भाषेमधील)कवि. पंडित रत्नाकर त्रिपाठी असे मुळ नाव असलेल्या या उत्तर भारतीय कविने सुरुवातीचा काही काळ औरंगजेबाकडेही चाकरी केली होती. पण तिथे केवळ बादशहाचे गुणगान करणारी काव्येच लिहीण्याची मुभा असल्याने या स्वाभिमानी कविने राजाश्रय नाकारला व पुढे तो शिवरायांची किर्ती ऐकुन तत्कालिन हिंदवी स्वराज्यात आला. केवळ व्यक्तीचे गुणगान करणार नाही म्हणुन औरंगजेबाचा आश्रय सोडलेला हा विलक्षण कवि शिवाजी महाराजांच्या दैवी व्यक्तिमत्वाने एवढा प्रभावीत झाला की त्याने राजांवर  महाकाव्ये लिहीली.

त्याने तर महाराजांच्या मोहिमा प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. शिवभुषण अन शिवाबावनी अशी दोन अतिशय सुंदर ब्रज भाषेतिल काव्ये त्याने रचली आहेत.शिवाजी महाराजांच्या १४ गुणांचे वर्णन त्याने एका छंदामध्ये केले आहे.......!
सुंदरता,गुरूता,प्रभुता,भनि भूषन होत है आदर जामे !
सज्जनाता औ,दयालुता,दिनता,कोमलता झलके प्रजामे !!
दान क्रुपानहु को करिबो,करिबो अभय दिननको बरजामे !
साहसनों रन ठेक,विवेक,इते गुन एक सिवा सरजा मे !!!!

हिंदू धर्म,हिंदू संस्क्रूती,कुळधर्म,कुळाचाराच्या आधारे चालणारी हिंदू परंपरा यांचे रक्षण आपल्या तलवारीच्या जोरावर केल्याचा उल्लेख एका कवनामध्ये करताना तो म्हणतो.....

वेद राखे विदित पुरान राखे सारयुत रामनाम राख्यो अति रसना सुधार मे !
हिंदून की चोटी राखी है सिपाहिनकी,कांधेमे जनेऊ राख्यो माला राखी गरमे !!
मिडी राखे मुगल मरोरि राखे पातसाह,वैरी पीसि राखे वरदा राख्यो करमे !
राजन की हद्द राखी तेग बल शिवराज,देवराखे देवल स्वधरम राख्यो घर मे !!!!
 
अर्थ --शिवजीराजाने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले.सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले.हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी(ऊपजीविका)चालविली. खांध्यांवरील जानवी अन गळ्यातील माला सुरक्षित ठेवल्या.मोंगलांचे व्यवस्थित मर्दन केले अन बादशहास मुरगाळून टाकले.शत्रूंचे चूर्ण केले.इतके करुन आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला.देवळात देव अन घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले.(५१)
......................................................................................................

कविराज भुषण यांच्या श्री सिवराज भुषण (शिवभुषण) या काव्यातल्या काही ओळी इथे देत आहे.

जै जयंति, जै आदि सकति, जै कालि कपर्दिनी
जै मधुकैटभ छलनी, देवि जै महिष बिमर्दिनी !!

इंद्र जिमि जंभपर, वाढव सुअंभपर, रावन सदंभपर
...............................रघुकुल राज है !
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यो सहस्त्रबाह पर
...............................राम द्विजराज है !
दावा दृमदंड पर, चीता मृगझुंडपर, भुषण बितुंडपर
..............................जैसे मृगराज है !
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यो मलिच्छ बंस पर
.............................. सेर सिवराज है
.............................. सर्जा सिवराज है !

वरील ओळींचा मराठी अनुवाद... (

इंद्र जृंभकासुरास, वडवानल सागरास |
गर्वयुक्त रावणास रघुकुलपति तो बली ||
वायु जसा मेघाला, शंभु जसा मदनाला,
आणि कार्तवीर्याला* राम विप्ररूप तो ||
वणवा जाळी द्रुमास, चित्ता फाडी मृगास,
मारी गजपुंगवास जैसा वनराज तो ||
तेज तमाच्या नाशा, कृष्ण जसा वधि कंसा,
म्लेंच्छांच्या ह्या वंशा शिवराजा काळ हो ||
(* कार्तवीर्य- मूळ रचनेत 'सहसबाह' असा उल्लेख आहे, तो म्हणजे कार्तवीर्य अर्थात 'सहस्रार्जुन'.)

दशरथ जु के राम, मै वसुदेव के गोपाल !
सोंई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल !!
सिव हि औरंग जीत सके, और न राजा राव !
हत्थिं मत्थ पर सिंह बिनु, और न घालै घाव !!
औरन को जो जनम है, सो याको यक रोज !
औरनको जो राज है सो, सिर सरजाको मौज !!

जीवन में नर लोग बडों, कवि भुषन भाषत पैज अडो है !
है नर लोगनमें राज बडों,सब राजनमे सिवराज बडों है !!
को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार...!
कवि भुशन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार..!!

तेरे तेज है सरजा दिनकरसो, दिनकर है तेरे तेज के निकटसो !
तेरो जस है सरजा हिमकरसो, हिमकर है तेरो जस के अकरसो !!

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ
............................सरजा जस आगे !
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ
........................ तेरे साहसके आगे !!

कवि सिवराज भुषण

1 comment:

  1. विशालदा,
    कवी भूषणांच, पुर्ण ५८६ छंद अनुवाद करून निनादराव बेडेकरांनी प्रकाशीत केलं आहे. मला त्या पुस्तकाचं नाव नाही कळू शकले, पण स्नेहांजली किंवा स्नेहल प्रकाशन, पुणे तर्फे ते प्रकाशीत झालं आहे ह्या १८ तारखेला रायगडावर. मी काही माहिती मिळाली की सांगतोच परत इथेच, कवी भूषण यांचे छंद अप्रतिम आहेत रे.

    ReplyDelete