अस्मादिक

   मी "विशाल विजय कुलकर्णी" एक सर्व-सामान्य मराठी माणुस. 

 माझं घर, आई-वडील, माझी पत्नी, माझी भावंडे आणि माझी मित्रमंडळी हेच माझं भाव-विश्व. इंजीनिअरींग पुर्ण झाल्यावर जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू झाली. अनेक प्रकारची कामे, नोकरी करत आता कुठे जरासे स्थैर्य लाभले आहे. या सगळ्या संघर्षात मोहाच्या, सुख-दु:खाच्या प्रत्येक क्षणी आधार होता तो फक्त आई-आण्णांचे आशिर्वाद आणि माझ्या कवितेचा. आयुष्यासाठी झगडताना कुठल्यातरी एका निसटत्या क्षणी असं जाणवलं की आपल्याला काव्यात, साहित्यात, साहित्य लेखनात स्वारस्य आहे, थोडीफार गतीही आहे. तसं वर्तमानपत्रे, साप्ताहिके यातुन कथा, कविता, लेख लिहायला सुरुवात केली.

 २१ डिसेंबर २००४ हा दिवस आयुष्याला आणखी एक सोनेरी वळण देवून गेला. त्या दिवशी माझी पत्नी सौ. सायली आपल्या सोनपावलांनी माझ्या आयुष्यात आली आणि तिचा पायगुण म्हणा की माझे नशिब म्हणा त्या दिवसापासुन भरभराटच होत गेली आहे. सायलीच्या एक मावशी श्रीमती तुंगाबाई कुलकर्णी  देखील एक उत्कृष्ट कवयित्री आहेत. आई-आण्णांबरोबरच त्यांचेही मार्गदर्शन आणि आशिर्वाद माझ्या लेखनकलेला लाभले. कवितेचे व्याकरण ही अत्यंत महत्वाची गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो.

कुठल्यातरी अशाच एका सुक्षणी मायबोली आणि मिसळपाव या संकेतस्थळांची माहिती मिळाली. मग मी या संकेतस्थळावर लिहायला सुरूवात केली. 
मायबोली तसेच मिसळपाव या मराठीला वाहीलेल्या, मराठी माणसांसाठी निर्माण झालेल्या संकेतस्थळांनी माझी लिखाणाची आवड जोपासली, वाढवली.  रसिक आणि सुज्ञ मायबोलीकर तसेच मिसळपाववासीयांनी माझ्या होणार्‍या चुका समजुन घेत लिखाणाला सदैव प्रोत्साहनच दिले. तिथे लिहीता लिहीता जाणवले की आपलं लिखाण काळाच्या ओघात कुठे वाहुन जायला नको. मग त्याला पर्यायी व्यवस्था शोधत असताना वर्ल्ड प्रेस ब्लॉगची ओळख झाली आणि मी इथे माझे लिखाण साठवायला सुरुवात केली. 
मग असं लक्षात आलं की आपल्याकडे लिहिण्यासारखं फारसं काहीनाहीये. मग श्री. तात्या अभ्यंकर ('मिसळपाव.कॉम'चे संस्थापक व संचालक) तसेच श्री. प्रमोदकाका देव यांच्या परवानगीने त्यांचे काही पुर्वप्रकाशित लेखन इथे प्रकाशित करण्याचे ठरवले. यासाठी परवानगी दिल्याबद्दल या दोघांचेही मनापासुन आभार. 
सर्व वाचक मित्रांना विनंती की तुमच्याकडे देखील काही चांगले साहित्य शेअर करण्यासाठी असेल (स्वरचित किंवा संग्रहित, अर्थात लेखकाच्या पुर्वपरवानगीसहीत) तर जरुर कळवावे. 
माझा हा प्रयत्न  मायबोली मराठीला आणि माझ्यावर उदंड प्रेम करणार्‍या माझ्या मायबोलीकर मित्रमंडळींना सादर समर्पित ! 
front1 copy 
आपला विनम्र, 
विशाल विजय कुलकर्णी 
१६३ अ, 'ज्योतिर्मयि',
श्री राघवेंद्रनगर हौसिंग सोसायटी,
मु.पो. जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र.
पिन. ४१३००२.
फोन. ०९९६७६६४९१९
इमेल.: vkulkarni.omnistar@gmail.com
 

No comments:

Post a Comment