Friday, July 16, 2010

जोखड

काल झाले जे होवुन गेले
आज तयाची स्मृती नको

नवा सुर्य आनंदे पेलु
याद रात्रीची पुन्हा नको

नव्या दमाने स्वप्ने पाहु
सत्याचा पण विसर नको

प्रयत्ने सारी स्वप्ने साकारु
निराशेची मग साथ नको

आकांक्षांच्या नभी वावरु
अपेक्षांचे ते ओझे नको

सुखे सारी नव्याने मिळवु
दु:खाची ती सयही नको

नवजीवना सामोरे जावु
जुन्या स्मृतींचे जोखड नको.

विशाल.

No comments:

Post a Comment