Showing posts with label त्रिवेणी. Show all posts
Showing posts with label त्रिवेणी. Show all posts

Tuesday, March 15, 2011

त्रिवेणी : ३

भेटू रे नक्कीच...., तू म्हणाली होतीस !
संध्याकाळ झालीय आता...., आयुष्याचीसुद्धा....
.
.
मी अजून एक ’जिंदगी’ मागवावी म्हणतोय ....
........................................................................................................

दिवस मावळतीकडे झुकायला लागलाय
थोड्या वेळात शशीकराचे आगमन होइल..
..
...
काय फरक पडतो म्हणा? तशीही तू येणार नाहीसच......
.........................................................................................................

सतारीच्या तारा जुळवल्या आणि मल्हाराला साद घातली
त्या सुरात मीच बेभान झालो, पण श्रोते नि:शब्द ....
..
...
डोळे उघडून पाहीलं...., त्यांच्या डोळ्यात मल्हाराने हजेरी लावलेली
.........................................................................................................

थोडा मुड चेंज.... ;)

सुर्याचे सोनेरी पुत्र पृथ्वीवर उतरायच्या आधीच...
मी दचकून जागा व्हायचा....
.
.
चाळीतल्या नळावर आया-माया जमलेल्या असायच्या ना!
..........................................................................................................

बायकोची आठवण आली की सगळे म्हणतात..
काही म्हणा पण शेजारच्याचीच बर्री.....
..
...
माझ्यासाठी तू, मामलेदारच्या मिसळीवरची तर्री...!! ;)
...........................................................................................................

विशाल

Thursday, July 8, 2010

त्रिवेणी (तिनोळ्या) - २

बस्स.., नको आता खुप कंटाळा आलाय..
कविता लिहायचा…, खर्डेघाशी करायचा…
एखादी कविता जगुन बघावी म्हणतो…, कस्से?

**********************************************************************

खुप लिहायचो…, खुप वाचायचो…, अगदी भरभरून..!
आजकाल सगळंच बंद, वेळच मिळत नाही बघ….
तुला वाचायला सुरूवात केल्यापासून…., खर्रच, तुझी शप्पथ !

***********************************************************************

तू सुर छेडले की माझी बोटे सळसळायला लागायची…
तुझ्या गळ्यातले अमृत…, नसानसात चैतन्य फुलायचे …
तू गात राहा… माझ्या मात्र सतारीची तार निखळलीय…..!

***********************************************************************

विशाल...

त्रिवेणी (तिनोळ्या) - १

वेडाच आहेस ….
जिथं पडायचं (प्रेमात) तिथं
उतरायचं म्हणतोयस….!

********************************

परतीची वाट विसरायची म्हणतोयस..
वेड्या, चक्रव्युहातून सुटका नसते म्हटलं…
कितीदा सांगितलं तरी सारखा विसरतोयस…!

***********************************

माणुस नेहमीच …
वेड्यासारखा वागतो
तिच्या मिठीऐवजी मोक्ष मागतो…. !

***********************************
विशाल