Showing posts with label विडंबन. Show all posts
Showing posts with label विडंबन. Show all posts

Friday, August 12, 2022

मी झेंडा घेतला नाही...

 संदीप खरेंची क्षमा मागून...


आमची प्रेरणा : मी मोर्चा नेला नाही आणि... ते सांगायलाच हवं का?


मी झेंडा घेतला नाही, मी लालसिंग पाहिला नाही

मी फेसबुकवर ही साधी, कधी पोस्ट टाकली नाही


भवताली भंगार-चाळे, पॉपकॉर्न घेवून बसताना

कुणी पोस्टीतून चिडताना, कुणी कमेंटून पिडताना

मी तटस्थ राहूनी भिजलो, कुंपणावर बसुनी जेव्हा

शिव्या द्यावया देखिल, कुणी मला निवडले नाही


संन्यस्त खोड मी आहे, मूळ फांद्या वठल्या जेथे

राजकारणात पकला गेलो, गुर्मीत झाडले कपडे

पण पोस्टीतून कुठलीही, चिडल्याची चिन्हे नाही

कुणी निषेध केला नाही, बॉयकॉटही केला नाही


फसलेला लालसिंग चढ्ढा, ते बटबटीतसे डोळे

सत्ता पाहुनी फिरती ईडी तोफेचे गोळे

मी शिवसेनेला भ्यालो, मी बीजेपीला भ्यालो

मी मनात ही काकांशी, कधी पंगा केला नाही


मज जन्म दुसरा मिळता, मी शब्द जाहलो असतो

मी असतो जर का शाई, तर थिजून गेलो असतो

मज लिहिता लिहिता कोणी, चिडले तडफडले नाही

मी क्रिटिक झालो नाही, मी भक्तही झालो नाही


मी झेंडा घेतला नाही, मी लालसिंग पाहिला नाही

मी फेसबुकवर ही साधी, कधी पोस्ट टाकली नाही


-- जूनाच इडंबनकार इरसाल सोलापूरकर

Tuesday, May 7, 2019

चांदण्यात फ़िरताना ....

वाढत्या उकाड्याला आमची छोटीशी आदरांजली 😜🤣 - एक विडंबन

****************

विडंबन ...

चांदण्यात फ़िरताना
घामाने भिजलास क़ाय?
सख़या रे, घामट ही
घामट ही... उष्णता

भिजलेल्या केसातुन
थिजले मी एकटीच
घनदाट आमराई
पडली मागे कधीच
झडलेल्या पर्णराशी
मजला रे छळतात

सांग कशी छत्रीविना
पार करू गर्दीचा पूर
उन्ह-वारा छळवादी
मेघ उन्हाला फितूर
श्वास तुझा घामदर्प
स्पर्श तुझा उष्माघात

पुसू दे ना घाम गड़े
भिजले हे वस्त्र आतून
कोपला रे बॉस माझा
गेला संतापून ..
तुझिया नयनात सूर्य
माझ्या हृदयी आगआग

चांदण्यात फ़िरताना
घामाने भिजलास क़ाय?
सख़या रे, घामट ही
घामट ही... उष्णता

- विशल्या नेरेगावकर

***********

मुळ गीत...

चांदण्यात फिरताना
माझा धरलास हात
सखया रे, आवर ही
सावर ही चांदरात

निजलेल्या गावातुन
आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे
पडले मागे कधीच
ह्या इथल्या तरुछाया
पण सारे जाणतात

सांग कशी तुजविनाच
पार करू पुनवपूर
तुज वारा छळवादी
अन्‌ हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस
स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे
जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे
गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र
माझ्या हृदयी प्रभात

चांदण्यात फिरताना
माझा धरलास हात
सखया रे, आवर ही
सावर ही चांदरात

- कविवर्य सुरेश भट

Friday, March 29, 2019

माझे हसे झाले......




पाजल्याने* तू मला माझे हसे झाले
निंदकाला पाहिजे होते तसे झाले

ग्लासला कोड़े गड्या पडले नवे आता
समजुतीने प्यायलो मग कायसे झाले?

उदर आ वासून बसले ओत ना अजुनी
संपला कोटा न अजुनी हायसे झाले

दुखवट्याची कोडगी किमया किती सांगू
सोवळे जे कालचे पिवुनी 'बशे' झाले

फक्त एखादाच वेडा सोबती असतो
आणण्या सिगरेट कोणी छानसे झाले

चाल बघता बेवड्याची वाटते, माझ्या
पाकिटावर पाशवी ते वार से झाले

मी दया माझी करोनी सोडली मदिरा
'बाळ' म्हणुनी यार माझे बारसे झाले

स्वप्न होते बार मध्ये बांधण्याचे घर
पूर्ण होता स्वप्न 'त्यांचे' कोळसे झाले

का गड्या तु बास म्हणतो पाहुनी प्याला
यार माझे नाव बघ बदनामसे झाले

• इथे 'मदिरा' वाचावे. ( हे उम्यासाठी आहे, त्याला भलतेसलते प्रश्न पडतात लगेच म्हणून) 😛

- इरसाल पनवेलकर

Sunday, May 21, 2017

क़ाय झाले ...

बऱ्याच दिवसात विडंबन या आवडत्या काव्यप्रकाराला हात घातला नव्हता. पण काल नंदुभैयाची 'काय झाले' ही अप्रतिम गझल वाचली आणि पुन्हा एकदा सुरसुरी आली. भैया , एक डाव माफी कर रे ! ;)

भैय्याची मुळ गझल इथे आहे  https://m.facebook.com/story.php?story_fbid=10206778730945522&id=1792786168

Sadanand Gopal Bendre _/!\_

कोरडा झाला घसा तर क़ाय झाले
ओतला थोडा शिसा तर काय झाले

रोज माझी वारुणीशी भेट होते
(आटला असला 'कसा' तर काय झाले)

नर्तकी नाचून ती कंटाळलेली
मी म्हणालो या बसा तर काय झाले

ग्लास तर केव्हाच माझा फोडला तू
संपला सगळा पसा तर काय झाले

दारुच्या ग्लासास जो वंगाळ म्हणतो
फोडले त्या माणसा तर काय झाले

बाटली चोरून माझी जे सटकले
कापला त्यांचा खिसा तर काय झाले

इरसाल म्हमईकर

Tuesday, May 24, 2016

हवीस तू ....

बर्‍याच दिवसात या आवडत्या लेखनप्रकाराला हात घातलेला नाही, म्हटले चला आज जरा कल्ला करुयात.

खुपदा असे होते की टेबलावरची मैफील बर्‍याच रात्रीपर्यंत रंगते, विशेषतः ती एखाद्याच्या घरी जमलेली असेल तर अजुनच. अशा वेळी हळू-हळू मदीरेच्या आहारी जाता-जाता जवळच्या धुम्रकांड्या कधी संपत जातात ले लक्षातच येत नाही. एक वेळ अशी येते की शेवटची एकच शिल्लक राहते. रात्र बरीच झालेली असल्याने आता नव्याने विकत मिळण्याची शक्यता राहीलेली नसते. तेव्हा साहजिकच शेवटची धुम्रकांडी मैफील संपल्यावर वापरू या भावनेने शिल्लक ठेवली जाते. या शेवटच्या धुम्रकांडीची किंमत फक्त अट्टल दारुड्यासच कळू शकते...

त्या शिल्लक उरलेल्या शेवटच्या धुम्रकांडीस मनःपूर्वक.....
आमची प्रेरणा : अर्थातच कविवर्य श्री. जगदीश खेबुडकर यांची क्षमा मागुन

हवीस तू, हवीस तू, हवीस मज तू, हवीस तू
तनु डोलते मदीरेसंगे दूर उभी का उदास तू?

रतीसौंदर्यही पडे तोकडे, धुराविना हे झिंगून जाणे
तुझ्यापुढे मज स्कॉच बापुडी, झुरतो मी अन् हताश तू

या सोनेरी धुराड्यातूनी, रात्र जागते दिवस होवूनी
वलयांकित त्या धुम्रकलांनी, गुंगवणारा सुवास तू

तारुण्याच्या उंबरठ्यावर, मादक तुजवर जडली प्रीती
या मोहाच्या पूर्तीसाठी, होशील का मम प्रयास तू

इरसाल म्हमईकर....

Friday, November 6, 2015

माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !

(ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे माझी नव्हे आणि कृपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये.)

प्रेरणा

मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !

ओढणी ती माथ्यावरी
'स्टोल' मुखा कव्हर करी
मोबाइल रुळे उरी
'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !

जन्मजन्मांचा मी वासू
इथे कधी तिथे बसू
प्रेमी, म्हणावे की कामी?
नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !

इरसाल म्हमईकर

Thursday, June 18, 2015

प्यार हमे किस मोड पे ले आया : विडंबन

आमच्या कंपनीच्या यंदाच्या फ़ॅमिली डे निमीत्त एका डान्स साठी ’सत्ते पे सत्ता’ या चित्रपटातील ’प्यार हमे किस मोड पें ले आया’ या गाण्याचे अस्मादिकांनी केलेले विडंबन..



हम ने क्या कोड भेजा जो कहा दीवाना
हम को नही कुछ समझ ज़रा समझाना
’चेक इन’ मे जब ’कोड’ कोई फ़ट जाए
तब धड़कन और बैचेनी बढ़ती जाए
जब कोइ गिनता है रातों को तारे
तब समझो कोइ ’इश्यू’ गया प्यारे

प्यार (P'Iyer) हमे किस मोड़ पे ले आया
कि फिल करे हाय
हाय..
कोइ ये बताए क्या होगा

प्यार तुम्हे किस मोड़ पे ले आया
की फिल करे हाय
हाय...
कोइ ये बताए क्या होगा
मिटींग बूला लोssssss
अरे कोइ इन्व्हाईट तो भेजो यार
मिटींग कराने से भी नींद नहीं आयेगी...
मिटींग ना कराने से भी नींद नहीं आती है
मिटींग करानेवाली जाने कब आयेगीsssss
...... शोर ना मचाओ वरना सँड्राsss जाग जाएगी

प्यार (P'Iyer) तुम्हे किस मोड़ पे ले आया
के फिल करे हाए, हाय कोई ये बताए, क्या होगा

प्यार (P'Iyer) हमे किस मोड़ पे ले आया
के फिल करे हाए, हाय कोई तो बताए, क्या होगा

होना क्या है? जा के उन्हे ले आएँगे

(प्यार (P'Iyer) हमे किस मोड़ पे ले आया
के Phil करे हाए, हाय
कोई ये बताए, क्या होगा) -2

’टेस्टींग’, ’क्यु.ए.’... ये कैसी मजबूरी
मिल गये कोड, फिर रिलीजमें क्यूँ हैं दूरी
अरे, पीएम है राजी तो रिलीजभी करवायेंगे
दी ना अगर क्यु.. ने भी मंज़ूरी

री रा री रा रा
पीएम है राजी तो रिलीज भी करवायेंगे
दी ना अगर क्यु.. ने भी मंज़ूरी

प्यार (P'Iyer) हमें किस मोड़ पे ले आया
के दिल करे हाय, हाय कोई ये बताए, क्या होगा -2

P.S.

प्यार उर्फ़ P'Iyer उर्फ़े प्रकाश अय्यर : एम.डी.  ऑफ़ ट्रिंबल आय.सी.टी.
फिल : Engg. head  फिल हॉल
पीएम : प्रॉडक्ट मॅनेजर
सॅंड्रा : Admin Manager
क्युए : QA क्वालिटी एनालिस्ट 
विशाल कुलकर्णी

Friday, November 8, 2013

"माझेच जगणे खरे....."

आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो? 

ज्यांना ही कविता (विडंबन) कळणार नाही, त्यांनी सरळ घरी जाऊन कार्टून नेटवर्क किंवा गेला बाजार ’झी मराठी’च्या मालिका बघाव्यात. 

हुकूमावरून

(गेल्या धा वर्षापासून नवाच असलेला) नव-ईडंबनकार ईरसाल म्हमईकर

अमेयदांची मुळ कविता इथे आहे ...
https://www.facebook.com/amey.pandit.12/posts/10200756409655806

विडंबन :

गुत्त्याच्या पुढती उभे अजुनही आशाळभुत वीर ते
भाषा कृद्ध, तिची अनेक शकले, वाणीतुनी सांडते 

वारूणीत तनू समस्त भिजली वैकुंठ झाले खुजे
जोशाने उठती अता, कचरले भार्येस ना शूर ते

दारूडा उठतो पहाट सरता.., साकी त्या हाकारते
अजुनही उरली, कशी न सरली? आश्चर्य त्या वाटते 
ओकारी मग त्यां भरात करतो, शोधी नवे सोबती
शुद्धीच्या मिटल्या खुणा मग सुरा देहात साकारते 

दारूड्यास असा तयार बघुनी इतरांसही ज्वर चढे
माझ्याहून इथे असे कुणितरी ज्याचे पिणे ना सरे
"मदिरेवीण उदास जिवन जसे भकास होउन झिजे"
दारूडा हसतो जनांस म्हणतो "माझेच जगणे खरे"

आहे मद्य जरी कटू, वचन हे साक्षात घ्या जाणुनी
क्लेशांचा अपुल्या पडे विसरही प्याला 'मधू' पाहुनी 

ईरसाल म्हमईकर

Friday, October 4, 2013

हि दिल्ली हाय एक जतरा ...

आमची प्रेरणा अर्थातच जगदिश खेबुडकरांचं हे जिवंत गाणं

ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा
जो दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा

पाच वर्षाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी
नाव कुणाचे, नाकामंदी कुनी बांदली दोरी
जागा होऊन बोलल त्याला, हाय कमांडचा हादरा

यु आयडीचा शिनीमा बगा, बगा सोडुनी काम
आधार झाला निराधार ना इथे राहीला राम
कितीक योजना आशा लावूनी उगा दावतीया नखरा

ह्यो फिरता घोडा नाव त्याचं सरकार
कुनी नोकरशहा, मंत्री-संत्री टांग टाकुनी स्वार
हितंच हाय परि दिसत न्हाई पब्लिक मारतय चकरा

हि लोकशाहीची खानावळ लै खवाट
कुनी चोर भेटतो, भ्रष्ट कुनी, कुनी 'भाट'
सवलतीसाठी लाळ गाळुन शेपुट हालवी कुतरा

ह्या सत्तेपायी इसर पडतो जनतेचा
कागदावरी पाऊस पडतो सुसाट खोट्या वचनांचा
आश्वासनांची जंत्री घेऊन पब्लिकला मारत्यात पतरा

ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा
ह्या दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा ... !!














तळटिप : ('दिल्ली' हा शब्द इथे सत्तेचे प्रतिक म्हणून वापरलेला आहे. 'दिल्ली' या शहराविषयी मनात कसलाही आकस नाही)


इरसाल म्हमईकर  

Monday, October 3, 2011

किती ग्लास माझे....

आमची प्रेरणा : दिवसास माझे

दिवसास माझे किती हे दिलासे
संध्याकाळ माझी करते खुलासे
तुझा विरह का हा दाटून येतो
होतात सिगरेटचे, 'कश' माझे उसासे

तशी फारशी ही नसे आर्तता
तू जाता उदरी, सरते व्यर्थता
दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता

घेऊन फिरतो सिगरेटी कुणाच्या
बहरतात गात्री आठवा कधींच्या
हलकेच ग्लासात तिज ओततो मी
चुकवुन नजरा अधाशी सोबत्यांच्या

थेंब पाण्याचे घसा जाळतात
अखेरचे घोट का मला टाळतात?
हरवून जाते कधी शुद्ध माझी,
इशारे साकिचे तसेही पाळतात

आता सांज होईल गडे 'चांदणी'
असावी वोडका, अन साथ रमणी
हाणुन चखणा मग मी धुंद व्हावे
किती ग्लास झाले चिंता 'बिलाची' !


हुकुमावरून....
अखिल सिंहगड रोड  "चांदणी बार" सदस्य समिती

Tuesday, April 12, 2011

बारची या रीत न्यारी शिकवते पचवायला....

मुळ गझल 

गावठीही हाय जोवर लागते रिचवायला
थांबणे सोसेल तोवर लागते ढोसायला...

वारुणीचे ग्लास पाहुन धुंद होती माणसे
भोवताली अप्सरा मग लागती भासायला...

त्या रिकाम्या बाटलीचे हासणे खोटारडे
लागलेला वेळ थोडा ग्लासही फ़ोडायला...

बेवड्यांना सांगतो मी थांबणे आता नको
वेटरांचा धीर आता लागला संपायला...

बारची या रीत न्यारी शिकवते पचवायला
लागते मग सवय वेड्या.., ओकण्याची व्हायला!

वृत्त : कालगंगा
लगावली :गालगागा गालगागा गालगागा गालगा

नव हझलकार इरसाल म्हमईकर

Wednesday, March 23, 2011

पिवून घ्यावी..! (हझल)

पुन्हा नव्याने जुन्याच जागी तसेच सारे जमूत मित्रा
परमिटरुमच्या चविष्ट गप्पा पुन्हा जरा आठवूत मित्रा...

मनात खळखळ, उरात धडधड, हळूच येइल शिपायदादा
परमिट नाही खिशात आता पचवुन दारू नडूत मित्रा....

मुखात व्हिस्की, करात चखणा.., झणी बिपाशा दिसेल आता
नवथर कोर्‍या, नव्या भिडूला पुन्हा अता आवरूत मित्रा...

उगाच तूम्ही मला चिडवता, तशात दारू पुन्हा उतरते
भरून प्याले अबोल होणे, स्मरून खळखळ हसूत मित्रा...

तुडुंब भरता उदर सुरेने पुन्हा स्मरे मग सखी नशीली
अखेरची ती सिगार होती, स्मरून तिजला रडूत मित्रा...

चटावलेल्या जिभेस लहरी, हवी विदेशी मधूमदीरा
पहा कसे काजवे चमकती, पिऊन देशी पडूत मित्रा...

पहाट होता हळूच सांगू भरावयाला अजून मधुरा
नको उतारा, उगाच आता, पुनश्च प्याला भरूत मित्रा...

उतावळा तू मनात इतका कशास "विशल्या" लटपटण्याला ?
पिवून घ्यावी ! उद्यास कोठे... ? असूत किंवा नसूत मित्रा...

मायबोलीवरील एक ज्येष्ठ गझलकार श्री. निशिकांत देशपांडे यांची ही सुंदर गझल बघितल्यावर राहवले नाही. नकळत माझ्यातला ’इरसाल म्हमईकर’ जागा झाला आणि जन्माला आली एक हझल.....!! लिहू का नको, लिहू का नको करत एकदम प्रमोदकाका देव यांची आज्ञा झाली 'होळी ई-विशेषांकासाठी' काहीतरी विनोदी लिहीण्याची....

मग निशिकांतजींच्या अनुमतीनेच त्यांच्या गझलेचे विडंबन म्हणून ही हझल रचली. निशिकांतजींचे अनुमतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! निशिकांतजी कुठे चुक झाली असल्यास मनःपूर्वक क्षमस्व !!

श्री. निशिकांत यांची मुळ गझल इथे वाचा.
हि रचना होळी विशेषांकात इथे वाचता येइल.

वृत्त : हिरण्यकेशी
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

नव-ग(ह)झलकार इरसाल म्हमईकर....

Thursday, November 25, 2010

कालचा घेणेकरी....

आमची प्रेरणा सांगायलाच हवी काय? :cool:

कालचा घेणेकरी मणभर शिव्यांचे सडे शिंपून गेला...

ती अर्धोन्मिलित दाराची फट...
तिचा गैरफायदा घेत त्याने घेतलेली तूझी चाहूल...
अंगभर कुजकट हास्याची शाल कवटाळून
त्याच्या शिव्यांच्या तांडवात दंगलेला तूझा शेजारी...

तूझ्या भिंतीच्या फटीतून बघत वैरी होऊन राहीलेला,
तो तूझ्या फजितीवर खदखदुन हसलेला तूझा शेजारी...
गालावर घेणेकर्‍याचा एक हात पडला आणि...
हसुन हसुन स्टूलवरुन खाली पडलेला शेजारी....

त्यानंतर कितीतरी वेळ शेजारी कुत्सित हसत होता....
कानात...
देहात....
मनात....

ते पडसाद आज पुन्हा उमटले...

बघ, दाराबाहेर कदाचित आता घेणेकरी नसेल....
पण त्याच्याइतकाच उत्सुक तो शेजारीही आहे हे खिडकीची थडथड नक्कीच सांगेल.

एक इरसाल शेजारी  :evil:

Friday, November 19, 2010

तू नसताना ....

आमची प्रेरणा सांगायलाच हवी काय? :-P

तू नसताना बाटल्यांचा बहर काय वर्णावा,
दाटीवाटी करुन बुचांचा रोजच सडा पडावा!

तू नसताना भरतो फ्रीजर सारा घरात माझ्या,
व्यापुन जातो कण न कण वाईन्सने ताज्या..

तू नसताना घरात येती मित्र सारे पिणारे,
ग्लासांमधल्या थेंबा-थेंबातुनी मदीरा गं पाझरें..

तू नसताना ड्रेसिंग-टेबल माझा राग-राग करते,
कॉस्मेटिक्सचे ड्रॉव्हर तुझे, माझ्या चखण्याने भरते...

तू नसताना परीसर पडतो माझ्यासाठी अपुरा!
कधी इथे अन कधी तिथे मी पसरतो सर्व पसारा...

तू नसण्याचे खरेतर आहे स्वप्न माझे नित्याचे..
सत्य एवढे भीषण आता नकोच स्वप्ने बघणे!

ईरसाल म्हमईकर

Saturday, October 23, 2010

तुझ्या आणि माझ्या भोजनाची ती वेळ...

आशुचँप, मित्रा ... तुझ्या " तुझ्या आणि माझ्या मीलनाची ती वेळ" या नितांत सुंदर कवितेला माझा आचरट झब्बू :-P  क्षमस्व :)

तुझ्या आणि माझ्या जेवणाची ती वेळ
उदर होते अधीर फुकटच्या खादगीसाठी
हाताला सोडवत नव्हती वाटी बासुंदीची
अन भज्यांचीही तापली होती रंध्रे
साखरभात केशरी हिंदकळत होता जरासा.....

वर्षानुवर्षे भुकेल्या क्षुब्ध उपाश्यासारखी
जेव्हा सभ्यता, शुचिता गेली होती संपून
जबरी मम पोटाला पडत होते विळखे
पेटलेल्या जठराग्निच्या हावरट सर्पांचे

ताटातल्या वाटीतली मलई सोडून,
कविता करायला सवड होती कोणाला
अधीर झाली होती गात्रे आणि ...
वाढू लागले शरिराचे जडत्व क्षणाक्षणाला

श्रीखंड सोहळे अन पूरीचा घास,
मिथ्या ही सृष्टी नि भलतेच भास,
वाट्यामागून वाट्या सरल्या पोटात,
उघडले वदन अन घेतला मुखी ग्रास...

उडवत ठिकर्‍या सार्‍या लज्जा-संकोचाच्या
बेफाम मारला हात आडवा अन लाडवावर,
अन खेचला शर्ट शेजारी बसल्या भार्येने,
थांब , असुदे लाज, भुकेला घाल जरा आवर

काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेला सगळा आहार माझ्यात जेव्हा
पोटातल्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर...
माझ्याच डोळ्यांसमोर....
आणि शोधू लागले पत्रिका उद्याच्या भोजन-आमंत्रणाची  !

नवकवि-इडंबनकार इरसाल म्हमईकर

Tuesday, August 17, 2010

बरं झालं श्रावणा तू आलास....

आमची प्रेरणा श्री. गणेश कुलकर्णी (समीप) यांची ही सुरेख कविता....

बरं झालं श्रावणा तू आलास...
नाही तरी आजकाल मला...
उचक्याच लागत नव्हत्या..
कारण ते मला पार विसरूनच ...
गेले होते!

तू समोर दिसलास ...
ते मला आणि...
आम्ही तिला आठवायला लागलो...
प्रत्येक घोटागणीक...
ते मला..मी त्यांना सावरायला लागलो...

बरं झालं श्रावणा तू आलास....
नाहीतर मी एकटाच रिचवत होतो.

इरसाल म्हमईकर

Wednesday, August 11, 2010

नाही पुन्हा कधी ही .... (डॉक्टरसाहेब येकडाव माफी करा)

आमची प्रेरणा अर्थातच डॉक्टरसाहेबांची ही सुंदर कविता

पहिलीच वेळ होती खाऊन (पादण्याची)
नाही पुन्हा कधीही तशी विसरावयाची .....


होतो हपापलेले अन ताट पक्वान्नाचे,
उपाशी अन पोटाला आस आमंत्रणाची,
रुजवात ती झाली रश्श्यातल्या नशेची,
थांबली नाही पुन्हा कधी ही .....


कुजबुजली माय कानी ही घंटा आपत्तीची,
शिर-शिर आतड्यातली, गळती प्रारंभाची,
हळूवार मग करानी सोडली गाठ नाडीची,
बांधली नाही पुन्हा कधीही .....


वस्त्रास भान सुटले, ना राहिली जगाची,
फुलला नगारा, नी संपली गरज लज्जेची,
फुटे बांध संयमाचा, रंगली कडा अंतर्वस्त्रांची,
लाज नुरली पुन्हा कधीही .....


आत्म्यास गवसली मग वाट आवरण्याची,
अदभुत जाणिवांचे अन भान विसरण्याची,
होवून तृप्त तरीही सदा अतृप्त राहण्याची,
नाही पुन्हा कधी ही .....


इरसाल म्हमईकर

Thursday, July 8, 2010

अतरंग…

जैपालभौंची ही सुंदर कवित वाचल्यावर आम्हाला राहवले नाही, अंतरंगात गडबड सुरू झाली अन इडंबन जलमलं !

पावसाचं खाणं
मातीत जाणं
पोटात गडगड होणं
अतरंगी ....

ओला टॉवेल
पिवळी नक्षी
कायमच्या साक्षी
अतरंगी .....

गच्च दरवाजे
ओली थरथर
अधिरलेले उदर
अतरंगी ......

उठे उधाण
सरे देहभान
पोटात तुफान
अतरंगी ......

झाकल्या खुणा
का उघडता पुन्हा
घडला काय गुन्हा?
अतरंगी ......

नवईडंबनकार ईरसाल

(बस्स्स नकोस आता)

आमचं पण रनिंग बिटवीन द विकेट….. Wink
अर्थात आमची प्रेरणा : इथे आणि इथे
कवितेमागे धावणं
थांबवलं आजपासुन..
कारण ती सुचतच नाही मूळी
आणि ट ला ट संयोगाने आलीच..
तरी व्याकरणाचा गंध नाही मला
मग एवढी खर्डेघाशी कशाला?
मला इतकं चिडवून, रडवून
(डोक्यावरले केस)
उपटून उपटून
जमलीस तर काय जमलीस?
किती आणि कसं सांगू?
कालपर्यंत होती तितकी, आज
नाहीये आता खाज?
विडंबनांमागे धावणं…
सुरू आजपासून !

‘नवइडंबनकार इरसाल खोटे’

‘म’ वाली ….

बरेच दिवस शांत होतो. पण सद्ध्या कौतुकराव शिरोडकरांनी लावलेला धडाका बघून आम्हालाही सुरसुरी आली. कौतुकरावांच्याच http://www.maayboli.com/node/14055 या सुंदर कवितेला आमचे हे विडंबन सादर समर्पित.

’बाई’ ने पुरावे खुले मांडलेले…
‘साहेबां’शी दुरावे किती वाढलेले…,

पिपासू नेत्यांचे घसे कोरडे अन…
खंड भुखंडांचे वाया चाललेले ….,

वासना धनाची प्रभागास जाळी ….
चरे नित्य आमदार निधीस लाभलेले,

दिसे राजधानीची कवाडे मनाशी…
रडतात पुढारी, तिकीट कापलेले,

द्यावे..? घ्यावे..? कसे सिद्ध व्हावे..?
सारेच प्रश्न जनपथी टांगलेले…,

उठे हात दोन्ही, ” कुणी होय वाली?”
मन – मोहन सोनिया चरणी गुंतलेले …. !

(आता जुना झालेला) ईडंबनकार ईरसाल खोटे