Showing posts with label बाबाच्या कविता. Show all posts
Showing posts with label बाबाच्या कविता. Show all posts
Thursday, October 15, 2020
लाडू ....
लाडू
डोळा पाणी भरून वाहावे
हसता कोणी वळून पाहावे
लेक लाडकी रूसूनी बसता
बाबाने नकळत व्याकुळ व्हावे
लट केसांची भाळावर अडली
अन गुलाब गाली फुगून बसली
बाबाला पडतो प्रश्न नेहमी
राजकुमारी का रूष्ट जाहली?
रोज सकाळी मी उठण्यापूर्वी
अन हळूच गाली हसण्यापूर्वी
निघूनी जातो बॅग घेवूनी
तो गेला हे मज कळण्यापूर्वी
ती उठते तेव्हा घरभर फिरते
मग बाबा बाबा करत शोधते
बाबा नच दिसता डोळे भरती
लाडू आईच्या कुशीत शिरते
चांदोबा मामा दिसताच नभी
रुसवा सारा आवरून अवघी
बाबा दिसण्याची वाट पहाते
मग सायंकाळी खिडकीत उभी
बाबा दिसता मग फुगवा सरतो
अन मम्माचाही चेहरा फुलतो
बाबा दिसता ती खुशीत येते
लेक लाडकी मग खुदकन हसते
© विशाल कुलकर्णी
Friday, March 29, 2019
परी
सोनसावळी
स्वप्ने सगळी
रूप सुखाचे
घेवूनी आली
भाळावरती
कुंतल कुरळे
ओठावरचे
हसु कोवळे
टकमक डोळा
किती कुतूहल
आले कुठे? ही,
कसली वर्दळ
हळवा बाबा
आतुर आई
अधिर मनाला
नवी नवलाई
दंतहिन परि
हसू निरागस
जणु सुखांनी
भिजले नवरस
या हास्यासम
अमृत नाही
या सौख्याला
तुलना नाही
© विशाल कुलकर्णी
Friday, September 30, 2011
लेक लाडकी ...
थोबडापुस्तकावरील ’मराठी कविता’ गृपच्या ’लेक लाडकी’ या विषयांतर्गत लिहीलेली कविता
कधी भासते ती फुलराणी
गाते सदा आनंदगाणी
जीवनी आली ही मधुराणी
लेक लाडकी या बापाची !
गालावरती खळी मनोहर
लट रेंगाळे भाळी सुंदर
अधुरी तिजवीण जिवनगाणी
भेट आगळी परमेशाची !
लटके करशी किती बहाणे?
क्षणात रुसणे, हळुच रडणे
क्षणी हासते बाळ शहाणी
ठेव अनोखी मातपित्याची !
कधी हळुच ती कुशीत येते
हलकेच माझे अश्रु पुसते
लेक लाडकी तुझी शहाणी
नसे कुणाची, मी बाबाची !
तिला न ठावे त्रागा करणे
आवडे न तिज उगाच फ़ुगणे
माय-बाप सांगती कहाणी
दैवे दिधल्या वरदानाची !
हवी कुणाला मग तुप-रोटी
कुणा हवी श्रीमंती खोटी?
मुलगी समृद्धीची 'खाणी'
पुण्याई जणु गतजन्मीची !
विशाल
कधी भासते ती फुलराणी
गाते सदा आनंदगाणी
जीवनी आली ही मधुराणी
लेक लाडकी या बापाची !
गालावरती खळी मनोहर
लट रेंगाळे भाळी सुंदर
अधुरी तिजवीण जिवनगाणी
भेट आगळी परमेशाची !
लटके करशी किती बहाणे?
क्षणात रुसणे, हळुच रडणे
क्षणी हासते बाळ शहाणी
ठेव अनोखी मातपित्याची !
कधी हळुच ती कुशीत येते
हलकेच माझे अश्रु पुसते
लेक लाडकी तुझी शहाणी
नसे कुणाची, मी बाबाची !
तिला न ठावे त्रागा करणे
आवडे न तिज उगाच फ़ुगणे
माय-बाप सांगती कहाणी
दैवे दिधल्या वरदानाची !
हवी कुणाला मग तुप-रोटी
कुणा हवी श्रीमंती खोटी?
मुलगी समृद्धीची 'खाणी'
पुण्याई जणु गतजन्मीची !
विशाल
Subscribe to:
Posts (Atom)