Showing posts with label रसग्रहण. Show all posts
Showing posts with label रसग्रहण. Show all posts

Thursday, July 8, 2010

‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन

‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :

 “मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं !

काय घडत होतं ?

हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.

काय मोडणार होतं ?

 हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅंझीनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली. घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते.

अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते.

कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.

भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता

त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.

तव जननी-ह्रद विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी

तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.

तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं 

‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला । सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी

पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.

भू विरह कसा सतत साहू या पुढती । दशदिशा तमोमय होती

तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.

गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे जरि
उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. 
ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.

ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा

राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.

भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.

तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।। 

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. 
असं वाटून ते म्हणतात-

या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ? 

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, 
आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –

तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे 

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल.
पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.

कथिल हे अगस्तिस आता । रे 

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू. मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !

साभार – स्वरूपयोग

साभार – संदर्भ : www.savarkar.org

कबीर – सत्याचा आरसा

संत कबीर …., हा माणुस मला नेहमीच कोड्यात पाडत आलेला आहे. त्याच्या प्रत्येक दोह्यातून इतके वेगवेगळे अर्थ निघतात किं आपण अचंभित होवून जातो. जगणं शिकवणारा, जगणं समृद्ध करणारा हा माणुस.
काही दिवसांपुर्वी श्री. राहुल देशपांडे यांच्या आवाजाने नटलेला “कबीर बानी” नावाचा सुंदर अल्बम बाजारात आला आहे. त्या संदर्भाने www.mimarathi.net  या मराठी संस्थळाचे चालक-मालक श्री. राजे उर्फ़ राज जैन यांनी मी मराठीवर एक सुंदर लेख लिहीला होता. त्यात कबिराचे काही दोहे त्यांनी अर्थासकट दिले आहेत. त्याच्या प्रतिसादातही काही रसिक वाचकांनी काही अतिशय सुंदर दोहे उद्धृत केले आहेत. ते त्यांच्या (राजे आणि रसिक वाचक) परवानगीने जसेच्या तसे इथे प्रकाशित करतो आहे.

राहुल देशपांडेंचा “कबीर बानी” कुणाला हवा असल्यास मी मराठीवर विक्रीसाठी (ऒनलाईन) उपलब्ध आहे. इच्छुकांनी खालील दुव्यावर टिचकी मारुन पाहायला हरकत नाही.

मीम वरील राजेंचा मुळ लेख

कबीर बानी : म्युझिक फ़ॊर सोल (ऒनलाईन खरेदी)

लेखक : श्री. राज जैन

१४ जून म्हणजे संत कबीर ह्यांचा जन्म दिवस.
ह्यांच्या बदल मला जास्त काही माहिती नाही आहे पण.. ह्यांची व माझी ओळख ही अशीच त्यांच्या दोहयातून होत गेली व हा संत म्हणण्यापेक्षा कवी कधी मनात घर करुन बसला ते कळलेच नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचे मर्म त्यांनी व्यक्त करुन दाखवले.
चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥
माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥
माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥
तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥
गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥
सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥
साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥
धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥
कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥
माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥
रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥
दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥
बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥
साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय।
सार-सार को गहि रहै थोथा देई उडाय॥
साँई इतना दीजिए जामें कुटुंब समाय ।
मैं भी भूखा ना रहूँ साधु न भुखा जाय॥
जो तोको काँटा बुवै ताहि बोव तू फूल।
तोहि फूल को फूल है वाको है तिरसुल॥
उठा बगुला प्रेम का तिनका चढ़ा अकास।
तिनका तिनके से मिला तिन का तिन के पास॥
सात समंदर की मसि करौं लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं हरि गुण लिखा न जाइ॥
साधू गाँठ न बाँधई उदर समाता लेय।
आगे पाछे हरी खड़े जब माँगे तब देय॥
काही निवडक दोहे व त्यांचा मला समजलेला अर्थ.
चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

वाह !
इच्छा, लोभ हे सगळे माती आहे. सगळा जे सगळे रामायण-महाभारत घडते त्याच्या मूळामध्ये हा लोभच आहे.
पण ज्या मनात मध्ये चिंता समाप्त होते तेथे मग कसलीच चिंता राहत नाही मन एकदम निश्चिंत राहते..
व ज्याला काहिच इच्छा नाही, लोभ नाही व चिंता नाही तोच खरा शहेनशाह ! तोच खरा राजा !
माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माझे सर्वात आवडता दोहा आहे हा.
जे पेराल तेच उगवेल. जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल.
कोणीच काळाच्या वरती नाही सर्व शक्तीमान तो काळ आहे.
आज तु राजा आहेस तर तो काळ तुला रंक देखील करु शकतो.
तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

कोणाला कधीच छोटे समजू नये व त्यास त्रास देऊ नये, त्याच्या नियतीमुळे तो तेथे आहे,
जर त्याचे दिवस फिरले तर तो तुमच्यावर देखील भारी पडू शकेल, घमंड कधीच नको.
सर्वांना आदर द्या.
सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥


          गरज सरो वैद्य मरो अशी जर मानसिकता जर ठेवली तर वाईट काळामध्ये तुम्हाला कोणीच मदत   
          करणार नाही. तेव्हा आपल्या चांगल्या काळामध्ये लोकांना मदत करत रहा जेणे करुन तुमच्या वाईट
          काळामध्ये कोणी ना कोणि तरी असेल जे तुम्हाला साथ देतील. आपल्या यशाच्या आनंदात मग्न राहून
          ज्यांच्यामुळे आपण येथे पोहचलो आहे त्यांना विसरु नका

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

 

देवा, मला एवढं मिळू दे की ज्यामध्ये माझ्या गरजापुर्ण होतील व घरी येणारा अगंतूकाची मी निट सेवा करु शकेन. अती देऊ नकोस ज्यामुळे मला घमंड होईल व कमी देखील नको देऊ की ज्यामुळे माझ्या घरी आलेल्या अगंतुकाची मी सेवा ना करु शकेन.

अर्धवट यांचा प्रतिसाद

मुल्ला बनके बांग पुकारे, वो क्या साहीब बहीरा हैं।
चुंटी के पग घुंगरू बांधे, वो भी अल्ला सुनता हैं॥

सोना यांचा प्रतिसाद


गुरु गोविंद दोउ खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो मिलाय ॥
देव आणि गुरू दोघे एकावेळी समोर उभे राहिले
कोणाच्या प्रथम पाया पडावे हा प्रश्न पडला
तेव्हा गुरूचे प्रथम स्मरण केले कारण
त्यानेच देव दाखवायला मदत केली.

पराग यांचा प्रतिसाद…

अबिदा आणि जगजित सिंग यांच्या आवाजतिल कबिराचे दोहे ऐकण्यासारखे आहेन . ते ऐकले कि शांत वाटते

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना, तो मुझसे बुरा न कोय
लालि मेरे लाल कि, जित देखु तित लाल
लालि देखन मै गयि, मै भि हो गयि लाल
सुखिया सब संसार है , खाये ओर सोये
दुखिया दास कबिर है, जागे ओर रोये

यावर पिडांकाकांनी मनापासुन दिलेला प्रतिसाद….. (जो कुणालाही पटेल)
 
by पिवळा डांबिस – 14/06/2010 – 07:13

राजे, तुम्ही आमच्या मर्मबंधातल्या ठेवीलाच हात घातलात की हो!!!
आज एक गुपित सांगतो,
आमचं माध्यमिक (८-१०) आणि हुच्च माध्यमिक (११-१२) वीला हिन्दी होतं! तेहि हायर हिन्दी!!!
कॅन यु रियली बिलिव्ह दॅट!!!
हास्य
त्या वेळेस एका तिवारीशास्त्रींच्या पायाशी बसून बरंच जमेल तसं अध्ययन केलं! तुलसीदास, सूरदास, कबीर आणि इतरही!!!
लेकिन दिल चुरा लिया तो कबीरजीने!!!!
(इसलिये महारास्ट्र के लोग हमें माफ कर दें — जयाबाईंच्या माडीवर शिकलेला डायवलॉक!!!)
हास्य
असो,
तुम्ही इथे कबिराचे दोहे देताय, मस्त गोष्ट आहे!
पण एक करा….
त्यांचा अर्थ द्यायची गुस्ताखी करू नका….
कबिराचे दोहे, ते तुम्हीच म्हटलंत तसेच आहेत, आपापल्या मनाचा आरसा!!!
आम्ही तुम्हाला आमचे मित्र मानतो म्हणून हे स्पष्ट लिहीलं, राग नसावा!!
कबिराच्याच शब्दांत सांगायचं तर…
“ऐसी दोस्ती न कीजिये, जैसे खीरा(काकडी)ने कीन
बाहरसे तो मिले हुये, भीतर फांके तीन!!!”
हास्य

आपला,
पिडांआजोबा.

(नोट टू मायसेल्फः कधीतरी एकदा कबिराचे दोहे आणि आयुष्यात आलेले अनुभव यावर लिहायला पाहिजे!! wink )
 
अजुनही जसजसे वाचकांकडुन दोहे जमा होत जातील तसे ते इथे ऎड करत जाईन. :-) 
 
राजे, हा सुंदर लेख शेअर केल्याबद्दल आणि माझ्या ब्लॊगवर टाकायची अनुमती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेल्या संत कबीराच्या काही रचना (यु ट्युब दुवे) इथे ऐका-पाहा.
 
विशाल कुलकर्णी.

आज़ जाने की जि़द ना करो…

राम राम मंडळी,
आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल!

फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं! बर्‍याच दिवसापासून या गाण्यावर दोन शब्द लिहायचा बेत होता, आज जरा सवड मिळाली.


आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..

आज़ जा़ने की जि़द ना करो.. !

क्या बात है, एक अतिशय शांत स्वभावाचं, परंतु तेवढंच उत्कट गाणं! भावनेचा, स्वरांचा ओलावाही तेवढाच उत्कट! यमन रागाचं हे एक वेगळंच रूप!

मंडळी, आजपर्यंत हा यमन किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर यावा? मला तर अनेकदा प्रश्न पडतो की या रागाचं नक्की पोटेन्शियल तरी किती आहे?! ‘जिया ले गयो जी मोरा सावरीया’, ‘जा रे बदरा बैरी जा’ मधला अवखळ यमन, ‘समाधी साधन’ मधला सात्विक यमन, ‘जेथे सागरा धरणी मिळते’ मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, ‘दैवजात दु:खे भरता’ मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि ‘रंजिश ही सही’ किंवा ‘आज़ जा़ने की जि़द ना करो’ सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! किती, रुपं तरी किती आहेत या यमनची?! गाणं कुठल्याही अर्थाने असो, यमन प्रत्येक गाण्याच्या शब्दांना त्याच्या अलौकिक सुरावटीचे चार चांद लावल्यावाचून रहात नाही!

आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..


‘यू ही पेहेलू मे बैठे रहो..’ मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! ‘पेहेलू’ या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! ‘कानडाउ विठ्ठलू..’ आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! अहो शेवटी समुद्र हा सगळा एकच असतो हो, फक्त त्याची नांव वेगवेगळी असतात! Smile
‘बैठे रहो’ हे शब्द किती सुंदररित्या ऑफबिट टाकले आहेत!

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे
ऐसी बाते किया ना करो!
आज़ जा़ने की जि़द ना करो,


हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!!
ओहोहो! खल्लास…
‘हाये’ मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा ‘हाये’ हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! छ्या, ऐकूनच बेचैन व्हायला होतं! माझ्या मते इथे या गाण्याची इंटेन्सिटी आणि डेप्थ समजते!
‘हम तो लुट जाएंगे..’ मधल्या ‘हम’ वरची जागा पहा!

‘मर जाएंगे’, ‘लुट जाएंगे’ मधील ‘जाएंगे’ या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! गंधारावर किती खानदानी अदबशीरपणे ‘मर जाएंगे’, ‘लुट जाएंगे’ हे शब्द येतात! मंडळी, हा खास यमनातला गंधार बरं का! अगदी सुरेल तंबोर्‍यातून ऐकू येणारा, गळ्यातला गंधार म्हणतात ना, तो गंधार! आता काय सांगू तुम्हाला? अहो या एका गंधारात सगळा यमन दिसतो हो! यमनाचं यमनपण आणि गाण्याचं गाणंपण सिद्ध करणारा गंधार!
‘हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे’ ची सुरावट काळीज घायळ करते! क्या केहेने.. साला आपली तर या सुरावटीवर जान निछावर!

‘ऐसी बाते किया ना करो..’!

वा वा! ‘किया’ या शब्दावरची जागा पाहा. ‘करो’ हा शब्द कसा ठेवलाय पाहा फंरिदाबाईने! सुंदर..!
खरंच कमाल आहे या फ़रिदा खानुमची. या बाईच्या गाण्यात किती जिवंतपणा आहे, किती आर्जव आहे! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! आमच्या हिंदुस्थानी रागसंगीतात आवाज नुसताच छान आणि सुरेख असून चालत नाही तर तो तेवढाच जवारीदारही असावा लागतो. फंरिदाबाईचा आवाज असाच अगदी जवारीदार आहे. तंबोरादेखील असाच जवारीदार असला पाहिजे तरच तो सुरेल बोलतो आणि हीच तर आपल्या रागसंगीताची खासियत आहे मंडळी! सुरेलतेबरोबरच, बाईच उर्दूचे उच्चार देखील किती स्वच्छ आहेत! क्या बात है…!

असो, तर मंडळी असं हे दिल खलास करणारं गाणं! बरेच दिवस यावर लिहीन लिहीन म्हणत होतो, अखेर आज टाईम गावला! एखादं गाणं जमून जातं म्हणतात ना, तसं हे गाणं जमलं आहे. अनेक वाद्यांचा ताफा नाही, की कुठलं मोठं ऑर्केस्ट्रेशन नाही! उतम शब्द, साधी पेटी-तबल्याची साथसंगत, यमनसारखा राग आणि फ़रिदाबाईची गायकी, एवढ्यावरच हे गाणं उभं आहे! मी जेव्हा ‘फ़रिदाबाईची गायकी’ हे शब्द वापरतो तेव्हा मला नेमकं काय म्हणायचं आहे हे कदाचित हिंदुस्थानी रागसंगीतात जाणणारी मंडळी अधिक चांगल्या रितीने समजू शकतील! बाईने दिपचंदी सारख्या ऑड तालाचं वजन काय छान सांभाळलंय! हार्मिनियमचं कॉर्डिंगही खासच आहे. तबलजीनेही अगदी समजून अत्यंत समर्पक आणि सुरेल ठेका धरला आहे! जियो…!
साला, या गाण्याचा माहोलच एकंदरीत फार सुरेख आहे!

आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे, तंबोरा जुळतो आहे, सारंगी त्याच्याशी मिळतंजुळतं घ्यायच्या प्रयत्नात आहे, तबल्याच्या सुरांची आस तंबोर्‍याच्या स्वराशी एकरूप होऊ पाहते आहे आणि काळजावर अक्षरश: कट्यार चालवणारी अशी एखादी ललना मादक आणि बेभान स्वरात,

‘आज़ जाने की जि़द ना करो..’ असं म्हणते आहे!
क्या बात है…!

–तात्या अभ्यंकर.