Friday, July 16, 2010

सखा ....

मत्त मी, मदमस्त मी
आषाढीचा जलद मी
साद घालतो उधाणवारा
………..पाऊस माझा सखा !

धुंद मी, मृदगंध मी
वरुणाचा वर्षाव मी
वळवाचा तो थेंब साजीरा
………..पाऊस माझा सखा !

मी धरा, दंवाचा थेंब मी
घनगंभीर आकाश मी
बेधुंद बरसती वर्षा धारा
………..पाऊस माझा सखा !

तृप्त मी, आश्वस्त मी
पाऊसवेडा चातक मी
मनमोराचा फुले पिसारा
…………पाऊस माझा सखा !

विशाल.

No comments:

Post a Comment