Thursday, July 22, 2010

पुन्हा एकदा ...

आता नकोच ते उसासे टाकणं,
जुनं आठवून उगाचच चरफडणं !
 
बेकरीच्या कळकट बरणीतल्या,
ओशटलेल्या केकसारखं बुरसटणं !
 
नको ते सदोदीत स्वप्नात रमणं,
स्वत:वरच ते पुन्हा पुन्हा वैतागणं !
 
आता करावं म्हणतो सुरू पुन्हा,
रोज नव्याने नवे नवे रस्ते बांधणं !
 
प्रत्येक वळणावर एखादा नवा,
जुन्यालाही छेदणारा प्रश्न उभारणं !
 
नकोत उगाळायला चुका जुन्या,
विसरेन म्हणतो रडगाणी उगाळणं !
 
आता नव्या हुरूपानं गुंते करणं,
जुन्याच समस्या नव्याने शोधणं !
 
कदाचीत या आगळ्या कैफातच,
पुन्हा प्रवाही होईल माझं जगणं !
 
विशाल

No comments:

Post a Comment