Monday, July 12, 2010

असहाय

संपले भास सारे
आभासही विरघले,
जागणार्‍या डोळ्यांतले
स्वप्न सारे भंगले !
वेगळ्या सार्‍या दिशा
आकाशही वेगळाले,
क्षितिजाच्या सीमेवरले
गांव सारे हरवले !
रेंगाळले रात्रीत काळ्या
चांदणे ते काजळलेले,
पाहवेना डागाळलेले
चंद्र बिंब कोमेजले !
लांबल्या सावल्या अन्
चालणे ही थांबलेले,
गावात माझ्या पोचलेले
मार्ग सारे खुरटले !
विशाल

No comments:

Post a Comment