Thursday, July 8, 2010

कॉंन्फरन्स …

कामाविषयी चर्चा करायला..
आम्ही नेहमीच कॉन्फरन्स बोलावतो
ट्रेमधली बिस्किटे आणि…
शेजारच्या ‘तंदुरी’चा आस्वाद घेताना
धंद्यावर बोलत हमरीतुमरीवर येतो..
वक्ता नावाचा हट्टी गाढव…
व्यासपिठावरून बोअर करत असतो…
आमच्या नाकाचा शेंडा मात्र शेजारच्या…
किचनमधून येणार्‍या वासावर असतो…
तंगडी चघळताना आम्ही…
गरिबी हटाववर संवाद (?) साधतो…
वेटर… एक लार्ज….
‘ऑन द रॉक्स’ मारतो..
कारण आम्ही नेहमीच…
पाणी बचतीचा पुरस्कार करतो…
लंचच्या वेळी डिनरचाही कोटा संपवतो
डिनरच्या आधी स्कॉच की शिवास..
अगदी न विसरता विचारून घेतो…
बॉटम्स अप करताना हट्टाने…
प्रत्येक घोटाबरोबर दारुबंदीचा पुरस्कार करतो
देशी पिवून बायकोला मारणार्‍या
पांडूवर कारवाईची मागणी करतो..
त्याला कळायला नको…?
आम्ही बघ बरं…. तिलाही बरोबर घेवून बसतो
आम्ही गांधीवादी, हिंसेचा राग राग करतो
मराठी राज्यभाषा झालीच पाहीजे…
अट्टाहासाने सांगत शँपेनचे पेग रिचवतो….
मेंबरांच्या बॉडीसमोर रिजोलुशन मांडतो
घड्याळाकडे बघत…
पुढच्या कॉन्फरन्समध्ये…
त्यानंतरच्या कॉन्फरन्सचा विषय ठरवायचे नक्की करतो.

ईरसाल म्हमईकर

No comments:

Post a Comment